शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सिडकोच्या शिल्लक घरांना अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 02:29 IST

विविध गृहप्रकल्पांत शिल्लक राहिलेल्या सिडकोच्या घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे.

नवी मुंबई : विविध गृहप्रकल्पांत शिल्लक राहिलेल्या सिडकोच्या घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे. या घरांसाठी जवळपास १३ हजार अर्जांची विक्री झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ ४५0 अर्ज सिडकोला प्राप्त झाले आहेत. असे असे असले तरी अर्ज सादर करण्याच्या मुदतीपर्यंत हा आकडा वाढेल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. एकूणच नव्या वर्षात सिडकोच्या येवू घातलेल्या नव्या गृहप्रकल्पामुळे ग्राहकांनी शिल्लक घरांकडे पाठ फिरविल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.विविध प्रकल्पांत विक्रीविना पडून असलेल्या ३८0 घरांच्या विक्रीसाठी सिडकोने अर्ज काढले होते. यात खारघर व उलवे येथील व्हॅलिशिल्प, वास्तुविहार,सेलिब्रेशन आणि उन्नती या गृहप्रकल्पातील घरांचा समावेश आहे. ३0 नोव्हेंबरपर्यंत अर्जांची विक्री केली जाणार आहे, तर १८ आॅक्टोबरपासून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. अर्ज स्वीकारण्याची ही मुदत २ डिसेंबरपर्यंत आहे. असे असले तरी आतापर्यंत केवळ ४५0 अर्ज सिडकोला प्राप्त झाले आहेत. तर जवळपास १३ हजार अर्जांची विक्री झाली आहे. असे असले तरी अर्ज सादर करण्याची मुदत २ डिसेंबरपर्यंत असल्याने या कालावधीत आणखी अर्ज प्राप्त होतील, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. प्रत्यक्षात मात्र नवीन वर्षात सिडकोने जाहीर केलेल्या नव्या गृहप्रकल्पामुळे ग्राहकांकडून या शिल्लक घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे जाणकारांचे मत आहे. सिडकोच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी तळोजा येथे १३,८१0 घरांचा नवीन गृहप्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. साधारण जानेवारी २0१७ पासून या गृहप्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे. या नव्या गृहप्रकल्पात विविध क्षेत्रफळांच्या बजेटमधील घरांचा समावेश आहे. वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत असलेल्या ग्राहकांसाठी येवू घातलेला नवीन गृहप्रकल्प पर्वणीचा वाटू लागला आहे. याचाच परिणाम म्हणून शिल्लक घरांच्या विक्रीचे अर्ज घेवून सुध्दा अनेकांनी अर्ज सादर करण्याबाबतचे आपले बेत बदलल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)>आगामी काळात सर्वसामान्यांना बजेटमधील घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यानुसार २0१९ पर्यंत ५५ हजार घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट सिडकोने बाळगले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील प्रत्येक वर्षी नवीन गृहप्रकल्प साकारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार पुढील तीन वर्षात टप्प्याटप्प्याने ३८,३१७ घरांची निर्मिती करण्याची योजना आहे. त्याबाबतचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. ही घरे घणसोली, वाशी, पाचनंद आदी ठिकाणी बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले