शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

राज्यातील १० जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊसमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 13:01 IST

यंदा देशात पावसाला चांगली सुरुवात झाली असली तरी काही ठिकाणी अजून सरासरीपेक्षा कमी पाऊस

ठळक मुद्देअहमदनगरमध्ये सर्वाधिक तर, पालघर, अकोला, यवतमाळमध्ये सर्वात कमी पाऊस

पुणे : केरळमध्ये वेळेवर आलेला मॉन्सून राज्यात काहीसा उशिरा आला तरी त्याने आपल्या नियोजित वेळेत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला़ आता त्याने संपूर्ण देश व्यापला आहे. यंदा देशभरात पावसाची चांगली सुरुवात झाली असली तरी राज्यात १० जिल्ह्यांमध्ये अजूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.तर १४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून ५ जिल्ह्यांत सरासरीच्या ६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.राज्यात ११ जूनपासून पाऊस सक्रिय झाला आहे.त्यानंतर दोन-तीन दिवसांतच त्याने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला.असे असले तरी संपूर्ण राज्यात त्याचे वितरण आतापर्यंत तरी काहीसे विषम झाले आहे. नेहमी मराठवाड्यात पावसाच्या सुरुवातीला पाण्याचा तुटवडा जाणवत असतो. पण यंदा मराठवाड्यात सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला आहे़ मराठवाड्यातील नांदेडचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.याउलट उत्तर कोकणच्या काही भागात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी सातत्याने अतिवृष्टीचा तडाखा सहन करायला लागलेल्या पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३५ टक्के कमी पाऊस पडला आहे. अहमदनगर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत पावसाने उच्चांक नोंदविला आहे. तेथे सरासरीच्या दुप्पटीहून अधिक ११३ टक्के पाऊस झाला आहे. अहमदनगरमध्ये २८ जूनपर्यंत सरासरी १०२ मिमी पाऊस पडतो़ तेथे आतापर्यंत २१७ मिमी इतका पाऊस झाला आहे.राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाला आहे.मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा ५० टक्के अधिक, तर विदर्भात सरासरीइतका पाऊस झाला आहे.

सरासरीपेक्षा सर्वात कमी पाऊस झालेले जिल्हे (टक्के)

पालघर (-३५), अकोला (-३३), यवतमाळ (-२९), मुंबई उपनगर (-२३), मुंबई शहर(-२१), रायगड (-१२), ठाणे (-९), गोंदिया (-१३), वर्धा (-८), गडचिरोली(-४)

सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्के)अहमदनगर (११३), सोलापूर (८५), औरंगाबाद (८४), बीड (७६), लातूर (७९)

सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेले जिल्हे (टक्के)धुळे (५९), जळगाव (५७), कोल्हापूर (४४), नंदुरबार (२४), नाशिक (३५), पुणे (४८), सांगली (३०), हिंगोली (२७), जालना (५२),उस्मानाबाद (२७),परभणी (४४), बुलडाणा (२१), सिंधुदुर्ग (२३), वाशिम (४०)

सरासरी व त्यापेक्षा अधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्के)रत्नागिरी (१४), सातारा (६), नांदेड (१०), अमरावती (१५), भंडारा (१७), चंद्रपूर (०), नागपूर (१६).

 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरी