रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By Admin | Updated: March 5, 2017 15:31 IST2017-03-05T13:32:22+5:302017-03-05T15:31:21+5:30

इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील एका प्रेमीयुगुलाने आज पहाटे भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेखाली

Lover's suicide by taking a jump under the train | रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

>ऑनलाइन लोकमत
घोटी (नाशिक), दि. 5- इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील एका प्रेमीयुगुलाने आज पहाटे भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेखाली स्वतःला झोकून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत इगतपुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील गि-हेवाडी येथील राजेश नामदेव गांगड (वय-20) आणि पुजा गणपत गि-हे  (वय-17) या प्रेमीयुगुलानी काल मध्यरात्री घरातून पळून जात घोटीजवळ रेल्वे रुळाकडे येत मुंबईकडे जाणा-या रेल्वेखाली आत्महत्या केली.
 
दरम्यान, या घटनेची माहिती आज सकाळी काही पादचाऱ्यांना समजताच त्यांनी पोलिसांना कळविले.घटनेची माहिती मिळताच इगतपुरीचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत दोन्ही मृतदेह इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह नातलगाच्या ताब्यात देण्यात आले. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Web Title: Lover's suicide by taking a jump under the train