लग्नमंडपातून नवरीचे फिल्मी स्टाइल पलायन, कारचालक बनून आला होता प्रियकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 04:04 IST2017-12-07T04:03:48+5:302017-12-07T04:04:48+5:30

ऐन लग्नाच्या मुहूर्तावर नवरी प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना सोमवारी आर्वी येथे घडली. प्रकरण पोलिसात गेले, पण नवरीचा अद्याप पत्ता लागलेला नाही. या फिल्मी स्टाइल पलायनामुळे आर्वीकर चकित झाले आहेत.

Lovely girl's style of marriage was gone from the wedding hall, the boyfriend had become a car driver | लग्नमंडपातून नवरीचे फिल्मी स्टाइल पलायन, कारचालक बनून आला होता प्रियकर

लग्नमंडपातून नवरीचे फिल्मी स्टाइल पलायन, कारचालक बनून आला होता प्रियकर

आर्वी (वर्धा) : ऐन लग्नाच्या मुहूर्तावर नवरी प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना सोमवारी आर्वी येथे घडली. प्रकरण पोलिसात गेले, पण नवरीचा अद्याप पत्ता लागलेला नाही. या फिल्मी स्टाइल पलायनामुळे आर्वीकर चकित झाले आहेत.
आर्वी येथील गजानन पुरुषोत्तम कळसकार (रा. हनुमान वॉर्ड) याचे यवतमाळ येथील मुलीशी लग्न ठरले होते. सोमवारी सकाळी ११च्या सुमारास नवरी मुलगी मावशीच्या घरून मंगल कार्यालयात मैत्रीण व तीन नातेवाईकांसोबत कारमधून निघाली. मंगल कार्यालयात पोहोचल्यावर मैत्रिणी आणि नातलग खाली उतरले. नवरी मुलगी खाली उतरण्याची वाट पाहात असतानाच चालकाने कार सुरू करून पोबारा केला. कारचालक हा तिचा प्रियकरच असल्याचे नंतर नातेवाईकांना समजले.
दरम्यान, वधुच्या नातलगांनी लग्नाचा दोन लाखांचा खर्च द्यावा, अशी मागणी वराकडील मंडळींनी आर्वीच्या पोलीस ठाण्यात केली आहे. आधी वधुचा शोध लागू दे, मग पुढील कार्यवाही करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. दरम्यान, याप्रकरणी आर्वी पोलिसांनी प्रियकराविरुद्ध भादंविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Lovely girl's style of marriage was gone from the wedding hall, the boyfriend had become a car driver