शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

मुक्तिभूमीवर लोटला भीमसागर

By admin | Updated: October 13, 2016 17:10 IST

येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त आज शहरातील मुक्तिभूमीवर लाखो भीमसैनिकांनी उपस्थित राहात

ऑनलाइन लोकमतयेवला (नाशिक), दि. 13 - येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त आज शहरातील मुक्तिभूमीवर लाखो भीमसैनिकांनी उपस्थित राहात डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. ८१ वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली होती. मुक्तिभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो समाजबांधवांनी हजेरी लावत नतमस्तक झाले. सकाळपासूनच येवला विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाऊले चालती मुक्तीभूमीची वाट म्हणत लाखो दलित बांधव मुक्तिभूमीवर नतमस्तक झाले. भारतीय बौद्ध महासंघाचे ध्वजारोहण अनिक गांगुर्डे यांच्या हस्ते झाले. समता सैनिक दलाने शहरातून रॅली काढली. कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन अ‍ॅड. माणिकराव शिंदे, पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, देवीदास निकम यांनी केले. स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. येवल्यात आलेल्या बौद्ध भिक्कूनी मुक्तिभूमी ते येवला-विंचूर चौफुलीदरम्यान रॅली काढली. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वैभव पगारे, वैभव साबळे, गौरव साबळे, पंकज घोडेराव, गणेश जाधव, संदीप झाल्टे, तेजस घोडेराव यांनी मोफत चरणसेवेचा विभाग सांभाळला. स्वारिपच्या वतीने रेडिओ व टीव्ही कलाकारांचा संगीत कलारजनीचा कार्यक्र म उशिरापर्यंत सुरू होता.अनेक ठिकाणांहून बसेस, मोटारसायकल, ट्रॅक्टर, टेम्पो, रिक्षा व पदयात्रेने लोक येथे येत होते. डीजेच्या तालावर भीमगीतांचा गजर करीत खेड्यापाड्यातून आलेला जनसागर रस्त्याच्या दुतर्फा दिसून येत होता.