शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

सिडकोच्या घरांची सोडत गणपतीत, की दिवाळीत?; मुहूर्तासाठी पुढच्या आठवड्यात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 07:58 IST

सध्या निर्मितीच्या प्रक्रियेत असलेल्या ३५ हजार घरांना महारेराची मंजुरी मिळाली आहे. त्यांच्या मार्केटिंग आणि विक्रीसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे.

नवी मुंबई : पंतपप्रधान आवस योजनेअंतर्गत सिडकोच्या प्रस्तावित  ३५ हजार घरांना महारेराची मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात यापैकी पाच हजार घरांची सोडत काढण्याची योजना सिडकोने तयार केली आहे परंतु, ती  गणपतीत काढायची की दिवाळीत याबाबत सिडकोच्या संबंधित विभागात संभ्रम आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी हे पुढच्या आठवड्यात आढावा बैठक घेणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. 

केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेंतर्गत सिडकोने विविध घटकांसाठी घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील चार वर्षांत ६७ हजारे बांधण्यात येणार आहेत. त्यांचा आराखडा तयार करून बांधकामासाठी कंत्राटदारही नेमले आहेत. त्यापैकींचे बांधकाम सुरू झाले आहे. विशेषतः कामोठे, जुईनगर रेल्वेस्थानक परिसरात कोर्ट एरिया तसेच वाशी येथील ट्रक टर्मिनलच्या जागेवर ती बांधली जात आहेत. 

सध्या निर्मितीच्या प्रक्रियेत असलेल्या ३५ हजार घरांना महारेराची मंजुरी मिळाली आहे. त्यांच्या मार्केटिंग आणि विक्रीसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. ३५ हजार घरांपैकी टप्प्याने सोडत काढण्याची सिडकोची योजना आहे. त्यातील पाच हजार घरांची गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सोडत काढण्याची योजना होती. परंतु, विविध कारणांमुळे हा बेत रद्द झाल्याचे बोलले जात आहे.  गणपती की दिवाळी याबाबतचा संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीने सिडकोने पावले उचलली आहेत.  

सत्तांतराचा फटकापाच हजार घरांची गणपतीत सोडत काढण्याचे सिडकोने निश्चित केले होते शिवाय त्यावेळचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यास अनुमती दिली होती. परंतु, आता राज्यात सत्तांतर झाले आहे तेव्हाचे नगरविकास मंत्री शिंदे हे आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. शिवाय अद्यापि खातेवाटप झालेली नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून गणपतीच्या मुहूर्तावरील सोडत प्रक्रिया पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :cidcoसिडको