औरंगाबादमधील घरांसाठी 25 डिसेंबरला लॉटरी
By Admin | Updated: November 25, 2014 01:44 IST2014-11-25T01:44:35+5:302014-11-25T01:44:35+5:30
औरंगाबाद येथील म्हाडाने बांधलेल्या 248 घरांसाठी 25 डिसेंबरला सोडत काढण्यात येणार आहे.

औरंगाबादमधील घरांसाठी 25 डिसेंबरला लॉटरी
मुंबई : औरंगाबाद येथील म्हाडाने बांधलेल्या 248 घरांसाठी 25 डिसेंबरला सोडत काढण्यात येणार आहे. 654 चौरस फुटांची ही सर्व घरे मध्यम उत्पन्न वर्ग गटासाठीची असून, त्यासाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
औरंगाबाद येथील तीसगाव सव्र्हे क्र. 1क्4/1 या भूखंडावर म्हाडाकडून बांधकाम करण्याचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू होते. त्यापैकी 248 घरांचे काम अंतिम टप्प्यात आल्याने त्याची सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची किंमत 22 लाख 95 हजार रुपये आहे. त्याचप्रमाणो नाशिक येथील नाशिक-पुणो रोड श्रमिकनगरातील 18 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. 582 चौरस फुटांच्या सदनिकेची किंमत 17 लाख 63 हजार 5क्क् इतकी आहे. मासिक उत्पन्न 4क् ते 7क् हजार असणारे अर्जासाठी पात्र असणार आहेत. अर्जासोबत25 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी प्राधिकरणाच्या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)