शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचे प्रसंगावधान आणि व्हॉट्सअॅपमुळे सापडले दोन वर्षांपासून बेपत्ता असलेले आजोबा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 00:42 IST

योग्य वापर केल्यास सोशल मीडिया वरदान ठरू शकतो याचा प्रत्यय शनिवारी पुन्हा एकदा आला. दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका आजोबांना तरुणाने दाखवलेले प्रसंगावधान आणि व्हॉट्सअॅपवर त्यांची माहिती देणारी पोस्ट व्हायरल झाल्याने पुन्हा एकटा कुटुंबीयांची भेट घडली.  

मुंबई -  योग्य वापर केल्यास सोशल मीडिया वरदान ठरू शकतो याचा प्रत्यय शनिवारी पुन्हा एकदा आला. दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या कोकणातील एका आजोबांना तरुणाने दाखवलेले प्रसंगावधान आणि व्हॉट्सअॅपवर त्यांची माहिती देणारी पोस्ट व्हायरल झाल्याने पुन्हा एकटा कुटुंबीयांची भेट घडली.   त्याचे झाले असे की दोन वर्षांपासून वेंगुर्ला तालुक्यातील चिपी येथून बेपत्ता असलेले गणपत बाळू सावंत (65) हे आजोबा आज डोंबिवलीतील मानपाडा रोड येथील स्टार कॉलनीजवळ अभिषेक परब या तरुणाला सापडले. आपल्याच विश्वात हरवलेले आणि भूकेने व्याकूळ झालेल्या या आजोबांची सदर तरुणाने विचारपूर केली. तसेच त्यांना खायला हवे का? असे विचारले. त्यावेळी या आजोबांनी आपल्या पिशव्या हरवल्या असून, आपण त्या शोधत आहोत, असे मालवणी भाषेत सांगितले. सदर तरुणही या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याने त्याने आजोबांचे बोलणे ऐकून अधिक विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आपले नाव गणपत बाळू सावंत असल्याचे सांगितले.   अभिषेक परब यांनी प्रसंगावधान दाखवत या आजोबांना आपल्यासोबत घरी नेले. तसेच या आजोबांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परब यांनी आजोबांचा फोटो आणि त्यांची थोडक्यात माहिती व्हॉट्स अॅपवर शेअर केली. बघता बघता ही पोस्ट बहुतांश व्हॉट्स अॅप ग्रुपवर व्हायरल झाली आणि आजोबांचे कुटुंबीय आणि गाववाल्यांपर्यंत पोहोचली. अनेक जणांनी सदर गृहस्थ दोन वर्षांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले.  दरम्यान, या आजोबांचा मुलगा दीपक सावंत यांनी अभिषेक परब यांच्याशी संपर्क साधला. तसेच आपण कल्याण येथे राहण्यास असून, तातडीने डोंबिवलीत पोहोचते, असे सांगितले. काही वेळाने दीपक सावंत डोंबिवलीत आले आणि अखेर दोन वर्षांनंतर पिता-पुत्रांची भेट झाली. देवदूतासारख्या धावून आलेल्या अभिषेक परब यांचे आभार मानून सावंत पिता पुत्र घरी परतले. दरम्यान, अभिषेक परब यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपdombivaliडोंबिवलीthaneठाणेkonkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग