दुर्गम भागांतील फेऱ्यांमुळे तोटा
By Admin | Updated: October 9, 2015 01:31 IST2015-10-09T01:31:45+5:302015-10-09T01:31:45+5:30
‘गाव तेथे एसटी’ अशी संकल्पना रावबत एसटी महामंडळाकडून दुर्गम भागातही बससेवा दिली जाते. या सेवेमुळे मात्र महामंडळाला मोठा फटका बसत असून वर्षाला तब्बल ५७३
दुर्गम भागांतील फेऱ्यांमुळे तोटा
मुंबई : ‘गाव तेथे एसटी’ अशी संकल्पना रावबत एसटी महामंडळाकडून दुर्गम भागातही बससेवा दिली जाते. या सेवेमुळे मात्र महामंडळाला मोठा फटका बसत असून वर्षाला तब्बल ५७३ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. मागणीनुसार
या फेऱ्या चालवत असल्यामुळे एसटीकडून त्या बंद करणे
शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
राज्यात एसटीच्या दररोज ९२ हजार फेऱ्या धावतात. यातील २९ हजार ४00 फेऱ्या या कमी उत्पन्नाच्या असून, त्यामुळे महामंडळाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. प्रवासी नसतानाही दुर्गम भागात ही सेवा देताना दरवर्षी तोटा एसटीला होतो.
प्रवासी कमी असल्याने दुर्गम भागात चालणाऱ्या एसटीच्या फेऱ्याही तोट्यात जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. एसटीचे तोट्यातील मार्गांची माहीती एसटी महामंडळाकडून सार्वजनिक उपक्रम समितीला दोन ते तीन महिन्यांत सादर केली जाणार आहे. हे मार्ग खासगी वाहतूकदारांना देण्याचा विचार शासनाकडून केला जात आहे. लांब पल्ल्यांचे तोट्यातील मार्ग कोणते याची माहिती एसटीकडून मिळविण्यात येत आहे. खासगी वाहतूकदारांकडून हेच मार्ग वापरले जातील. दुर्गम भागातील आणि कमी अंतराचे मार्ग त्यांना फायदेशीर ठरणारे नाहीत, असे सांगण्यात आले.
प्रवाशांची संख्या घटली
राज्यात एसटीच्या १७ हजार बस असून, वर्षाला ६७ ते ६८ लाख प्रवासी यामधून प्रवास करतात. गेल्या वर्षभरात एसटीचे ११ कोटी प्रवासी कमी झाले आहेत. २0१३-१४ मध्ये २५६ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. हाच प्रवास २0१४-१५ मध्ये फक्त २४५ कोटी प्रवाशांनी केला आहे.