शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हप्ता साडेआठ लाख लोकांकडून, लाभ फक्त २१४ जणांनाच!, पंतप्रधानांच्या नावे असलेल्या विम्यातही लुबाडणूकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 11:41 IST

चक्क पंतप्रधानांच्या नावे असलेल्या ‘सुरक्षा विमा योजना’ व ‘जीवन ज्योती’ योजनेमध्ये बँका लोकांच्या खात्यातून दरवर्षाला हप्ता तर कपात करून घेतात, परंतु त्याचा लाभ फारसा कुणाला होत नसल्याचेच चित्र पुढे आले आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : चक्क पंतप्रधानांच्या नावे असलेल्या ‘सुरक्षा विमा योजना’ व ‘जीवन ज्योती’ योजनेमध्ये बँका लोकांच्या खात्यातून दरवर्षाला हप्ता तर कपात करून घेतात, परंतु त्याचा लाभ फारसा कुणाला होत नसल्याचेच चित्र पुढे आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात ८ लाख ४६ हजार २०६ लोकांच्या खात्यातून या योजनांसाठी हप्ता घेतला आहे, परंतु प्रत्यक्षात फक्त २१४ लोकांना विमा संरक्षणाची रक्कम मिळाली आहे.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मोठा गाजावाजा करून प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (पीएमएसबीवाय) आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (पीएमजेजेबीवाय) सुरू करण्यात आल्या. सुरक्षा योजनेत १८ ते ७० वयोगटातील व्यक्तीच्या बँक खात्यातून वर्षाला १२ रुपये हप्त्यापोटी बँका कपात करून घेतात. त्याचा अपघाती मृत्यू किंवा शंभर टक्के अपंगत्व आल्यास २ लाख रुपये मिळतात. कमी अपंगत्व असल्यास १ लाख रुपये मिळतात.जीवन ज्योती योजनेत १८ ते ५० वयोगटातील व्यक्तीच्या खात्यातून वर्षाला ३३० रुपये कपात करून घेतले जातात. त्याचा मृत्यू झाल्यास त्यास २ लाख रुपये मिळतात. थेट देशाच्या पंतप्रधानांच्या नावे असलेल्या योजनेत पारदर्शीपणाचा कमालीचा अभाव आहे. कारण या दोन्ही योजनांचा लाभ किती लोकांना झाला, हेच कोणत्याही टप्प्यावर सांगितले जात नाही. प्रत्येक जिल्ह्यातील अग्रणी बँकेकडून किती लोकांचा विमा हप्ता बँकांनी कपात करून घेतला, याची माहिती आहे, परंतु त्याचवेळेला योजनेचा लाभ किती लोकांना मिळाला, याची माहिती उपलब्ध नाही.

कंपन्यांचे खिसे भरण्याचे काम...

  • बँका लोकांच्या खात्यातून प्रत्येकवर्षी ३१ मे रोजी या हप्त्याची रक्कम ॲटो डेबिटने कपात करून घेतात.
  • परंतु त्या ग्राहकाचा मृत्यू झाल्यास या योजनेचा लाभ देण्यासंदर्भात कोणतीच जबाबदारी घेत नाहीत.
  • कुणाचे निधन झाले हे आम्हाला कसे समजणार, अशी बँकांची भूमिका असते. त्यामुळे केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीचेच खिसे भरण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. 

कोल्हापुरातील चित्रयोजनेचे नाव                         सहभागी किती झाले?          लाभ किती जणांना मिळाला?

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना         ६ लाख १८ हजार ९७७             फक्त -२४प्रधानमंत्री जीवनज्योती योजना        २ लाख २७ हजार २२९             फक्त - १९०

या दोन्ही योजनांच्या हप्त्यापोटी एका वर्षात लोकांनी भरलेली रक्कम : ८ कोटी २४ लाख १३ हजार २९४

या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना मिळालेली रक्कम : ४ कोटी २८ लाख (सरासरी दोन लाख मिळाले असे गृहित धरून)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्य