आरटीओमध्ये होतेय वाहनचालकांची लुट
By Admin | Updated: May 8, 2014 22:29 IST2014-05-08T20:15:17+5:302014-05-08T22:29:33+5:30
संगम पूल व आळंदी येथील कार्यालयामध्ये वाहनांच्या पार्किर्ंगचा ठेका खाजगी ठेकेदारास देण्यात आला आहे.

आरटीओमध्ये होतेय वाहनचालकांची लुट
पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) पार्किर्ंगचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून करारामध्ये ठरवून दिलेल्या दरापेक्षा वाहनचालकांकडून जास्त पैसे घेऊन वाहनचालकांची लुट करण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत तसेच करारामध्ये कबूल केलेल्या अनेक शर्तीचे पालन ठेकेदाराकडून करण्यात येत नसल्याचे उघडकीस आले आहे.
संगम पूल व आळंदी येथील कार्यालयामध्ये वाहनांच्या पार्किर्ंगचा ठेका खाजगी ठेकेदारास देण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी हजारो दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची कामाच्या निमित्ताने ये-जा सुरू असते. दुचाकी चालकांकडून ३ रूपये तर चारचाकी वाहनचालकांकडून ६ रूपये आकारणी करण्याचे दरपत्रक आरटीओने ठरवून दिले आहे. मात्र प्रत्यक्षात दुचाकी चालकांकडून ५ रूपये तर चारचाकी चालकांकडून १० रूपये उकळण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. आरटीओ अधिकार्यांसमक्षच हे प्रकार घडत असतानाही त्यांच्याकडून काहीच कार्यवाही केली जात नाही. यामुळे ठेकेदारांचे चांगलेच फावते आहे.
ठेकेदाराच्या कर्मचार्यांना गणवेश तसेच आयकार्ड परिधान करावे. कार्यालयाच्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी तसेच परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी उचलावी अशा अनेक अटी करारामध्ये आहेत. मात्र प्रत्यक्षात त्या अटींचे पालन ठेकेदाराकडून होत नसल्याचे दिसून येते.