शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतोय - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 16:26 IST

शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त संजय राऊत यांनी पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

ठळक मुद्देआता पूर्ण सत्ता हाती यायचे स्वप्न आहे. शिवसेनेचे १८० आमदार येतील, तेव्हाच खरे स्वप्न पूर्ण होईल, असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबई : आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून आता पाहतो आहे. आता फक्त राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व करायची वेळ आली आहे, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त संजय राऊत यांनी पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी पाहण्याचे स्वप्न तर पूर्ण झाले. पण, आता आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतो आहे. आता फक्त राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व करायची वेळ आली आहे, असे संजय राऊत म्हणाले.

याचबरोबर, देशावर आलेल्या कोरोना संकट आणि चीन कुरापतींवर सुद्धा संजय राऊत यांनी भाष्य केले. तसेच, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, म्हणून महाराष्ट्र कोरोनाच्या संकटावर मात करू शकत आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. याशिवाय, आता पूर्ण सत्ता हाती यायचे स्वप्न आहे. शिवसेनेचे १८० आमदार येतील, तेव्हाच खरे स्वप्न पूर्ण होईल, असेही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेने विचारधारा बदलली नाही आणि शिवसेना कुणापुढे लाचारही होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना दिली. शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. यामध्ये आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला, तो मोडीत काढण्यासाठीच मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

याचबरोबर,  विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही आमची संस्कृती आहे. 'प्राण जाय पर वचन न जाये' ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेनाप्रमुखसुद्धा लाचार होणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. मला काही जण म्हणतात की तुम्ही आल्यापासून एका मागोमाग वादळ येत आहेत, पण शिवसेना एक वादळ आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच,  मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्यासोबत संपर्क कमी झाला असला तरी मी नात्यात अंतर पडू देणार नाही. त्याचप्रमाणे भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनी केला आहे. 

आणखी बातम्या...

अक्साई चीन आता परत घेण्याची वेळ आली आहे - जामयांग नामग्याल

मलाला युसूफझाई झाली 'ग्रॅज्युएट', आनंद साजरा करत सांगितलं 'फ्युचर प्लॅनिंग'

आकाशात दिसला रहस्यमय असा पांढरा फुगा; लोक म्हणाले, 'एलियन शिप'

Encounters In Jammu & Kashmir: सुरक्षा दलांना मोठं यश, जम्मू-काश्मीरमध्ये 8 दहशतवाद्यांना कंठस्नान 

India China FaceOff : शहीद जवानांच्या प्रत्येक कुटुंबाला 36 लाख रुपये आणि नोकरी मिळणार, बिहार सरकारचा निर्णय

निधड्या छातीच्या मनदीप सिंग यांनी 'अशी' दिली चिनी सैन्याला टक्कर; भावानं सांगितली त्यांच्या शौर्याची कहाणी 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना