लोणावळ्यात पावसाचा जोर वाढला; दिवसभर संततधार सुरु
By Admin | Updated: July 31, 2016 19:34 IST2016-07-31T19:04:29+5:302016-07-31T19:34:11+5:30
लोणावळा शहरात मागील दोन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचा शनिवारी रात्रीपासून जोर वाढला असून आज दिवसभर पावसाची संततधार सुरु आहे

लोणावळ्यात पावसाचा जोर वाढला; दिवसभर संततधार सुरु
ऑनलाइन लोकमत
लोणावळा : दि. ३१ - लोणावळा शहरात मागील दोन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचा शनिवारी रात्रीपासून जोर वाढला असून आज दिवसभर पावसाची संततधार सुरु आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात जोरदार बँटिंग करत विसावलेल्या पावसाचा शनिवारी सायंकाळनंतर जोर वाढला आहे. आज दिवसभर लहान प्रमाणात व सायंकाळपासून जोरदार पावसाला लोणावळ्यात सुरुवात झाल्याने डोंगरभागातील आठलेले धबधबे पुन्हा पुर्ण क्षमतेने वाहू लागले आहेत. शहरातील सखल भाग व रस्त्यावर देखिल मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. लोणावळा शहरात आज अखेर पर्यत २०.९० मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा पाऊस कमी असला तरी पावसाचा जोर पुढिल दोन तिन दिवस असाच कायम राहिल्यास पाऊस मागील वर्षीची सरासरी ओलांडू शकतो. पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांनी कामांशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस व नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना केले आहे.