शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
3
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
5
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
6
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
7
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
8
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
9
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
10
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
11
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
12
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
13
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
14
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
15
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
16
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
17
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
18
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
19
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

LMOTY 2020 : लॉकडाऊनमध्ये गरिबांची सेवा करणारे आमदार निलेश लंकेंचा लोकमतकडून सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 10:31 IST

Nilesh Lanke Lokmat Maharashtrian Of The Year Award 2020 : निलेश लंके हे अहमदनगरच्या पारनेरचे आमदार असून हे उपक्रमशील आमदार म्हणून सर्वत्र परिचित आहेत.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे राज्यातील रुग्णांच्या संख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी गरिबांना मदतीचा हात हात दिला. त्यांच्यासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्राच्या अहमदनगरमधील पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020" (Lokmat Maharashtrian Of The Year Award 2020) ने सन्मानित करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमध्ये दिवस-रात्र लोकांची सेवा केल्यामुळे लंके यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. 

निलेश लंके हे अहमदनगरच्या पारनेरचे आमदार असून हे उपक्रमशील आमदार म्हणून सर्वत्र परिचित आहेत. लंके यांनी लॉकडाऊनमध्ये अनेक गरजू लोकांना मोठी मदत केली. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसांपासूनच त्यांनी गरीबांचा मदतीचा हात दिला आहे. नगर-पुणे महामार्गावर त्यांनी अन्नछत्र उभारलं. तब्बल 68 दिवस असलेल्या या अन्नछत्रामध्ये आपल्या गावी परतणाऱ्या हजारो परप्रांतीय मजुरांची भूक भागवण्यात आली. त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. तसेच अनवाणी पायांनी आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांना चप्पल देखील दिली आहे.

आमदार निलेश लंके यांच्या प्रतिष्ठाने कोरोनाच्या संकटात एक कोविड सेंटर देखील उभारले. कोविड सेंटरमध्ये लोकांना सर्व सोयी-सुविधा देण्यात आल्या. या सेंटरमध्ये एक हजार बेड उपलब्ध होते. लक्षणे नसलेल्या पण पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांसाठी टीव्ही, मनोरंजनाच्या सोयी-सुविधा कोविड सेंटरमध्ये होते. महिलांसाठीही वेगळे दालन होते. लोकप्रतिनिधी जबाबदारीने काम करीत आहेत. आमदार निलेश लंके व त्यांचे ट्रस्ट अत्यंत परिश्रमपूर्वक चांगले काम करीत आहेत असं म्हणत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील लंके यांचं कौतुक केलं आहे. 

शरद पवार यांनी देखील लंकेंच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे. "आमदार साहेब जर तुम्ही दररोज इतकं चांगलं जेवण दिलंत तर लोक घराऐवजी इथेच कोविड सेंटरमध्ये राहणं पसंत करतील" असं पवारांनी म्हटलं होतं. लंके यांनी गरीब कुटुंबीयांनी लाखो रुपयांचं किराणा सामान दिलं आहे. तसेच वेळोवेळी मदत केली आहे. जेव्हा दुसऱ्या राज्यातील मजुरांना आपल्या गावात जाण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा लंके यांनी 200 वाहनांच्या मदतीने त्यांना आपल्या घरी सुखरुप पाठवण्याची व्यवस्था केली. निलेश लंके यांच्या या कौतुकास्पद आणि उल्लेखनीय कार्याचा "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020" पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAhmednagarअहमदनगरSharad Pawarशरद पवारlokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2020