शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचा मोठा विजय; २ लाखांच्या मताधिक्याने ठाकरेंचा उमेदवार पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 16:30 IST

loksabha Election Result - कल्याण मतदारसंघात महायुतीनं दमदार विजय मिळवला असून याठिकाणी मविआ उमेदवाराचा पराभव झाला आहे. 

कल्याण - ठाणे जिल्ह्यातील कल्याण मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे निवडणुकीत उभे होते. या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. 

कल्याण लोकसभा मतदारसंघात  श्रीकांत शिंदे यांना ४ लाख ३९ हजार ९६६ मते पडली तर मविआच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना २ लाख ३४ हजार ४८८ मते पडली. या मतदारसंघात जवळपास २ लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत. ठाणे आणि कल्याण या मतदारसंघाची लढाई प्रतिष्ठेची होती. कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेंचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले होते. परंतु ठाणे आणि कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारल्याचं दिसून येते. 

कल्याण लोकसभा मतदारसंघात २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा चार टक्के जास्त म्हणजे ५०.१२ टक्के मतदान झालं होतं. या ठिकाणी २० लाख ८२  हजार २२१ मतदारांपैकी १० लाख ४३ हजार ६१० मतदारांनी मतदान केलं होतं. महायुतीचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवली, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर मतदारसंघांच्या तुलनेत मुंब्रा-कळवा परिसरात झालेले मतदान महायुतीला चिंतेत टाकणारे होते.  कळवा मुंब्रा येथून २ लाख १६ हजार १५९, तर कल्याण ग्रामीणमधून २ लाख ३१ हजार १६२ आणि कल्याण पूर्वमधून १ लाख ५६ हजार २३५ मतदारांनी मतदान केले आहे. ही सर्वाधिक मते असून, डोंबिवलीत १ लाख ४२ हजार १४२, उल्हानसगर १ लाख ३१ हजार ५०५, तर अंबरनाथमध्ये १ लाख ६६ हजार ४०७ मतदान झाले होते. त्यात आज निकालात श्रीकांत शिंदे यांना सुरुवातीपासून आघाडी मिळाली. शेवटच्या टप्प्यापर्यंत ही आघाडी २ लाखांच्यावर पोहचली.  दरम्यान, एकूण मतदानाच्या टक्केवारीनुसार, ६०.२९ टक्के मते श्रीकांत शिंदे यांच्या पारड्यात पडली तर वैशाली दरेकर यांना ३२.१७ टक्के मते मिळाली. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनेही शाहबुद्दीन शेख सुलेमानी यांना तिकीट दिले होते. त्यांना १५ हजार ४६० मते पडली. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालkalyan-pcकल्याणmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४