शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही?; राज ठाकरेंचं मोठं विधान, कार्यकर्त्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 12:49 IST

लोकसभा निवडणुकीत मनसे स्वतंत्र लढणार की महायुतीत मनसेचा सहभाग होणार याबाबत पुढील काही दिवसांत स्पष्टता येणार आहे. 

मुंबई - Raj Thackeray on Loksabha ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणूक कुठल्याही क्षणी लागू शकते. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील आज दक्षिण मध्य मुंबईच्या मतदारसंघ दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरेंनीमनसे शाखांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा तुम्ही निवडणुकीचा विचार करू नका. लोकांशी संपर्क वाढवा, कामे करत राहा असा सल्ला देत लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केले आहे. 

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, पुढील ३-४ दिवसांत लोकसभा निवडणूक लढवायची की नाही हे सांगतो, तुम्ही काम करत राहा. लोकांपर्यंत पोहचा. बुथनिहाय एका कार्यकर्त्याने २५०-३०० लोकांशी संपर्कात राहावे अशाप्रकारे सूचना दिल्या आहेत. त्यामुळे एकूणच लोकसभा निवडणुकीत मनसे स्वतंत्र लढणार की महायुतीत मनसेचा सहभाग होणार याबाबत पुढील काही दिवसांत स्पष्टता येणार आहे. 

मनसे-भाजपा युतीची चर्चा

अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीवर सकारात्मक भाष्य केले. मनसेने घेतलेली व्यापक भूमिका आमच्याशी विसंगत नाही आहे. त्यांची क्षेत्रीय अस्मिता आम्हाला मान्य आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचे मुद्दे मांडले पाहिजे. सोबतच व्यापक भूमिका असावी असे आमचे मत होते. आज हिंदुत्वाची भूमिका मनसेने घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या व आमच्या भूमिकेत फार काही अंतर राहिलेले नाही. बाकी निवडणूकीत काय करायचे या गोष्टी तपशील व चर्चेच्या असतात. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतात असं फडणवीसांनी सांगितले. 

राज ठाकरेंना आलेला 'तो' फोन नेमका कुणाचा?

काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले, त्यानंतर राज ठाकरे एका शाखेच्या उद्घाटनासाठी जात होते. त्यावेळी वाटेतच राज ठाकरेंचा ताफा १५ मिनिटे थांबला होता. सातपूर येथील ही घटना आहे. शाखेच्या उद्घाटनाला जाताना रस्त्यातच अचानक राज ठाकरेंचा ताफा थांबल्याने अनेक तर्कवितर्क लढवले गेले. तब्बल १५ मिनिटे हा ताफा तिथेच होता. राज ठाकरेंना एक महत्त्वाचा फोन आला होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता हा फोन कुणाचा आणि ताफा वाटेतच अचानक का थांबवण्यात आला हे मात्र गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४MNSमनसेBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरे