शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

युती अन् आघाडीला धक्का! सांगलीत विशाल पाटील अपक्ष; सोलापुरात वंचितने घेतली माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 7:02 AM

राज्यातील ११ मतदारसंघांतील लढती स्पष्ट, उस्मानाबाद मतदारसंघात शेवटच्या दिवशी चौघांनी उमेदवारी मागे घेतली

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघांंच्या लढतींचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले असून एकूण २५८ उमेदवार रिंगणात आहेत. सांगली मतदारसंघात विशाल पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवली असून ते अपक्ष लढणार असल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. सोलापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्याने महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे.

सांगलीत महाविकास आघाडीने उद्धव सेनेचे चंद्रहार पाटील यांना तर भाजपने खा. संजय (काका) पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा आपल्याकडे घ्या आणि विशाल पाटील यांना उमेदवारी द्या, असा आग्रह काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी धरला होता पण तो मान्य झाला नाही म्हणून पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला. आज शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली नाही. 

सोलापुरात शिंदे-सातपुते यांच्यात थेट लढत२०१९ च्या निवडणुकीत सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर लढले होते आणि त्यांनी १ लाख ७० हजार मते घेतली होती. भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी यांचा १,५८,६०८ मतांनी विजय झाला होता. यावेळी वंचित मोठ्या प्रमाणात मतविभाजन करणार असे बोलले जात असतानाच राहुल गायकवाड यांनी माघार घेतली. 

या ठिकाणी भाजपचे राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे अशी मुख्य लढत रंगेल. एमआयएमने उमेदवार दिला नसून ‘संविधान संरक्षणाचे काम करू शकेल अशा उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा’असे आवाहन केले आहे. 

उस्मानाबादेत तिरंगी लढतउस्मानाबाद मतदारसंघात शेवटच्या दिवशी चौघांनी उमेदवारी मागे घेतली. यामुळे आता महाविकास आघाडी, महायुती अन् वंचित बहुजन आघाडीत तिरंगी सामना रंगणार आहे. आता ३१ उमेदवार लढतीत राहिले आहेत. मविआचे ओमप्रकाश राजे निंबाळकर व महायुतीच्याअर्चना पाटील यांच्यात  चुरस आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकरांना मिळणारी मते या निवडणुकीत जय-पराजयाचे कारण ठरण्याची शक्यता असल्याने लढतीला तिरंगी स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्वेतिहास पाहता पाटील-राजेनिंबाळकर कुटुंबात नेहमीच चुरशीची लढत होत आली आहे. यावेळी दीर-भावजयीत सामना होत आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sangli-pcसांगलीsolapur-pcसोलापूरbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४