‘लोकमत’ सिंधुदुर्गचा आज स्नेहमेळावा
By Admin | Updated: February 20, 2015 23:09 IST2015-02-20T22:50:30+5:302015-02-20T23:09:49+5:30
आठवा वर्धापनदिन : सावंतवाडीत ‘मेक इन सिंधुदुर्ग’ विशेषांकाचे प्रकाशन

‘लोकमत’ सिंधुदुर्गचा आज स्नेहमेळावा
सावंतवाडी : वाचकांच्या पाठबळावर पे्रम, जिव्हाळा आणि विश्वासार्हतेची परंपरा जपत सिंधुुदुर्ग जिल्ह्यात ‘लोकमत’ची दमदार वाटचाल सुरू आहे. स्नेहाचा हा झरा अखंड वाहता रहावा, यासाठी ‘लोकमत’ सिंधुदुर्ग आवृत्तीच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त आज, शनिवारी सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त सायंकाळी जिल्ह्यातील निवडक संघांची ग्रुप डान्स व सोलो डान्स स्पर्धा होणार आहे.
‘लोकमत’च्या दमदार वाटचालीत वाचक, हितचिंतक व वृत्तपत्र विक्रेते, एजंट, जाहिरातदार व समाजातील प्रत्येकाने प्रेमाचा वर्षाव केला आहे. या जिव्हाळ्याचे बंध आणखी दृढ व्हावेत, या उद्देशाने आज सायंकाळी पाच वाजता स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. आठव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत सावंतवाडी येथे विशेषांक प्रकाशनानंतर ग्रुप व सोलो डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्नेहमेळाव्याच्या ठिकाणीच स्पर्धा होणार आहे.
निरपेक्ष वृत्तीने जपलेल्या नीतीमूल्यांचा आदर केल्यामुळेच वाचकांच्या मनाचा ठाव घेण्यात आणि यशाचे उत्तुंग शिखर गाठण्यात ‘लोकमत’ परिवार यशस्वी ठरला आहे. कोकणच्या संपन्न परंपरेप्रमाणे प्रेमाने समृध्द
झालेला हा परिवार नवचैतन्य, उत्साहानिशी नव्या वाटचालीस सज्ज झाला आहे. या वाटचालीत सर्वांच्या प्रोत्साहनाची आवश्यकता वाटते,
म्हणूनच वर्धापनदिनाचा मुहूर्त साधत ‘लोकमत’ परिवाराने स्रेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. प्रत्येक क्षेत्रातील घटकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने केले आहे. (वार्ताहर)
‘मेक इन सिंधुदुर्ग’ विशेषांक
वर्धापनदिनानिमित्त ‘मेक इन सिंधुदुर्ग’ हा विशेषांक आज प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यातून जिल्ह्याच्या सामाजिक, उद्योग, आरोग्य, कृषी, शैक्षणिक, आदी क्षेत्रातील वाटचाल, भविष्यातील चित्र यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. जिल्ह्याचे बदलते रूप आणि अपेक्षांचा ऊहापोह याद्वारे करण्यात आला आहे.