लोकमत स्पेशल रिपोर्ट! बियाणे कंपन्यांवर कारवाई कधी?; कृषीमंत्र्यांनी घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 02:42 AM2020-06-28T02:42:06+5:302020-06-28T02:42:20+5:30

बियाणे बोगस आढळल्यास गुन्हे दाखल करणार !

Lokmat Special Report! When to take action against seed companies ?; The Minister of Agriculture took notice | लोकमत स्पेशल रिपोर्ट! बियाणे कंपन्यांवर कारवाई कधी?; कृषीमंत्र्यांनी घेतली दखल

लोकमत स्पेशल रिपोर्ट! बियाणे कंपन्यांवर कारवाई कधी?; कृषीमंत्र्यांनी घेतली दखल

Next

राजरत्न सिरसाट 

अकोला : नापिकी, कोरोनानंतरची टाळेबंदी, शेतमालाचे झालेले नुकसान या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा जिद्दीने खरीप हंगामाला सामोरा जात असताना यावर्षी अप्रमाणित, बोगस सोयाबीन बियाण्यांनी त्यांचा घात केला आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळासह (महाबीज) भरवशाच्या काही नामवंत खासगी कंपन्यांचे लाखो हेक्टरवर पेरणी केलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही.

राज्यभरात हजारो शेतकऱ्यांच्या तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला आहे. बियाणे न आलेले क्षेत्र ३० टक्क्यांवर आहे. राज्यात सोयाबीनचे सरासरी ४० लाख हेक्टर क्षेत्र आहे. विदर्भात यातील १६ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीन बियाणे पेरणी केली जाते. या सर्व क्षेत्रावर पेरणीसाठी १० ते ११ लाख क्विंटल बियाण्यांची गरज आहे. तथापि, गतवर्षी हे पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असताना सतत पाऊस सुरू होता. परिणामी उत्पादन कमी झाले. त्याचा परिणाम यावर्षी बियाणे उपलब्धतेवर झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाबीजने ५.५० लाखांऐवजी ३ लाख क्विंटलच बियाणे बाजारात उपलब्ध करुन दिले. इतर नामवंत ९ कंपन्यांनी बियाणे बाजारात उपलब्ध केले आहे.
आजमितीस जवळपास ७० टक्के सोयाबीन बियाण्यांची पेरणी झाली आहे; परंतु महाबीजसह इतर नामवंत कंपन्यांचे बियाणे उगवले नाही. सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींनंतर वर्धा येथे कृषी विभागाने ईगल कंपनीला नोटीस बजावली आहे.

सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने आता शेतकऱ्यांचे जे व्हायचे ते नुकसान झाले आहे. ते पुन्हा पेरणीने न भरून निघणारे आहे. त्यामुळे शेतकºयांना थेट नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी. - डॉ. प्रकाश मानकर, चेअरमन, महाराष्ट्र राज्य कृषक समाज

पावसाची वक्रदृष्टी
चांगल्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिल्याने शेतकºयांनी ३० मि.मी. पाऊस पडल्यानंतर लगेच पेरणी केली. त्यानंतर पावसाचा १० दिवस खंड पडला. तापमानही वाढल्याने अनेक भागात सोयाबीन अंकुरण्याऐवजी कुजले. काही भागात पेरणी केल्यानंतर लागलीच त्यावर दमदार पाऊस झाल्याने ते खोलवर दबले. त्यामुळे उगवलेले नाही, असे मत कृषी अधिकाºयांनी व्यक्त केले आहे.

सोयाबीन पेरले पण ते उगवले नसल्याच्या तक्रारी राज्याच्या काही भागांतून येत असून त्यांची चौकशी करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. बियाणे बोगस आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी ‘लोकमत’ला दिली.

परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे सोयाबीन विषयक तज्ज्ञ आणि कृषी खात्याचे ज्येष्ठ अधिकारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. सोयाबीन नेमके कोणत्या कारणांनी उगवत नाही, याचा अहवाल ही समिती देईल. समितीच्या अहवालाच्या आधारे तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. महाबीज आणि खासगी कंपन्यांची ही बियाणे आहेत. ज्या ठिकाणी महाबीजचे बियाणे उगवले नाही तेथे पर्यायी बियाणे शेतकºयांना तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश मी दिलेले आहेत. सोयाबीन उगवत नसल्याबद्दलच्या तक्रारी नियमानुसार आधी प्रांत अधिकाºयांकडे कराव्या लागत होत्या. मात्र आता शेतकºयांना तक्रारी करणे सोपे जावे व जास्तीत जास्त तक्रारी स्वीकारल्या जाव्यात यासाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदार पातळीवर तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत, असे भुसे यांनी सांगितले. सोयाबीन न उगवल्यामुळे शेतकºयांचे जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामेदेखील केले जात आहेत. बियाणे बोगस असल्याचे चौकशीत आढळले तर महाबीज असो वा खासगी कंपन्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Web Title: Lokmat Special Report! When to take action against seed companies ?; The Minister of Agriculture took notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी