शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

Lokmat Sarpanch Awards 2018 : पर्यावरण विभागातील ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’ पुरस्कार अंकुश गुंड यांना प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 13:39 IST

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’च्या सरपंच ऑफ द इअर (पर्यावरण विभाग) या पुरस्काराचा मान सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावचे सरपंच अंकुश रामचंद्र गुंड यांना प्रदान करण्यात आला. 

मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’च्या सरपंच ऑफ द इअर (पर्यावरण विभाग) या पुरस्काराचा मान सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावचे सरपंच अंकुश रामचंद्र गुंड यांना प्रदान करण्यात आला. 

गट - पर्यावरणसरपंचाचे नाव - अंकुश रामचंद्र गुंडगाव - अनगर/कोंबडवाडीतालुका - मोहोळजिल्हा - सोलापूर

जाणून द्या, अंकुश गुंड यांच्याविषयी...अंकुश रामचंद्र गुंड यांनी सरपंच झाल्यापासून गावामध्ये पर्यावरणविषयक जागृतीच्या दृष्टीने अनेक सुधारणा केल्या. २०१७-१८मध्ये गावामध्ये असलेल्या पिण्याच्या पाण्याची शास्त्रीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर गावात शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आर. ओ. प्लांट बसविण्यात आला. ताशी २ हजार लीटर वेगाने या प्लांटमधून पाणी शुद्ध केले जाते. ५ टनाचा चिलर, कॉइन बॉक्स व पंच कार्ड यंत्रणेसहही प्लांट सुविधा गावकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी अनगर नाल्यातील गाळ श्रमदानातून काढला आहे. गावातील एकुण ११५ वीजपोलवर एल. इ. डी. लाई बसवून उर्जेची बचत केली आहे. गावात पाचपीर, सावतामाळी मंदिर, इनाम वस्ती, कॉलेज परिसर येथे सौर उर्जेचे १ एच. पी. पंप बसवून वीजेची बचत केली आहे.वाड्यावस्तीवर लाईट नाही त्याठिकाणी सौरउर्जेवरील एकुण २१६ सौर दिवे बसवून वापरात आहेत. गावामध्ये ११ बायोगॅस यंत्रे बसविण्यात आली असून ती सर्व उत्तमरितीने कायान्वित आहेत. सरपंच अंकुश रामचंद्र गुंड यांनी गावात स्वच्छता राहावी यासाठी घंटागाडीचे नियोजन केले आहे. गावात बहुतांशी ठिकाणी सेप्टीटँक असून वाड्यावस्त्यांवर शौष खड्ड्यांचे शौचालय आहे. २०११-१२ मध्ये गावास निर्मल ग्राम पुरस्कार व २०१६-१७मध्ये गावाला हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले.वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान लोकवाटा माध्यमातून ५०० ट्री गार्डन बनवून १७०० झाडे लावण्यात आली. ४५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा ठराव १३ सप्टेंबर २०१७ रोजी ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. या पर्यावरणस्नेही प्रयत्नांमागे सरपंच अंकुश रामचंद्र गुंड यांची प्रेरणा आहे.

राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते. 

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Maharashtraमहाराष्ट्र