शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

Lokmat Sarpanch Awards 2018 : कोल्हापूरातील अनिल पाटील यांना शिक्षण विभागातील ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’ पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 13:59 IST

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (शिक्षण विभाग) हा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील मुदाळ गावचे सरपंच अनिल संभाजी पाटील यांना देण्यात आला.  

मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (शिक्षण विभाग) हा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील मुदाळ गावचे सरपंच अनिल संभाजी पाटील यांना देण्यात आला.  

गट - शिक्षणसरपंचाचे नाव - अनिल संभाजी पाटीलगाव - मुदाळतालुका - भुदरगडजिल्हा - कोल्हापूर

अनिल संभाजी यांची कामगिरी...

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्याचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाणारे व ३४८७ लोकवस्तीचे मुदाळ हे छोटेसे गाव. तिथे शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य आहे. मुदाळ गावचे रहिवासी मीठ व ट्रक व्यवसायात आहेत. मात्र त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. इथली तरुण मुले कोवळ््या वयातच शाळा सोडून व्यवसायाकडे वळली होती. अशा वेळेस अनिल संभाजी पाटील हेगावचे सरपंच झाले. त्यांनी मुदाळ गावामध्ये शिक्षणक्रांती केली. के.जी. पासून पी.जी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था या गावामध्ये केली. गावातील अंगणवाड्या ओस पडत होत्या. अनिल पाटील यांनी या अंगणवाड्या पुन्हा कशा फुलतील याचा प्रयत्न केला. आज गावामध्ये चार शासकीय अंगणवाड्यांमध्ये २०० हून अधिक बालके शिकत आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेची गावात असलेली शाळा मोडकळीसआलेली होती. विद्यार्थी संख्या कमी झाली होती. अनिल पाटील यांनी सरपंच या नात्याने शाळेत व शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. शैक्षणिक वर्ष २०१६/१७ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या परीक्षा परिषदेने घेतलेल्या पुर्व प्राथमिक स्कॉलरशिप स्पर्धेत शाळेचे तब्बल १६ विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत एकाच वेळी चमकले. गावात श्री सद्गुरु बाळुमामा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून इयत्ता५ वी ते १२ वी कला विज्ञान या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. अनिल पाटील यांनी या शिक्षणसंस्थेच्या सहकार्यातून प. बा. पाटील माध्यमिक विद्यालय येथे इंग्रजी माध्यमास पर्याय म्हणून इयत्ता ५ वी ते १० पर्यंत इंग्रजी माध्यमाची सोय करुन हा उपक्रम दर्जेदारपणे चालविला. सेमी इंग्रजीचे शिक्षण सर्व स्तरावर निशुल्क ठेवले. त्याचा लाभ सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यांना झाला. या प्रशालेत आज ४०हून अधिक प्रज्ञावान शिक्षक असन्ून १७००हून अधिक विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी इथे येतात. मुदाळ येथेआ. के. पी. पाटील फौंडेशनच्या माध्यमातून मुदाळ कृषी प्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनात ५०० स्टॉल असतात. कृषिपुरक गृहपयोगी गोष्टी, पाळीव जनावरे आदी विषयांची नीट मांडणी केलेली असते या प्रदर्शनास परिसरातील २ लाख लोक भेट देतात. 

राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस २५ लाखपंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून, ‘लोकमत’चा सरपंच आॅफ द ईअर पुरस्कार पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये तर विविध गटातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचातयींना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते. 

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Maharashtraमहाराष्ट्र