'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:17 IST2025-07-25T16:43:26+5:302025-07-25T17:17:48+5:30

Lokmat.com No. 1 Marathi News Website: जून महिन्यात तब्बल ६ कोटी २१ लाख ५३ हजाराच्या विक्रमी वाचकसंख्येसह 'लोकमत डॉट कॉम'ने अव्वल स्थान पटकावून मराठी माध्यमविश्वात आपला दबदबा सिद्ध केला आहे.

lokmat number one marathi news website as per comscore MMX Multi-Platform june data | 'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांनी पुन्हा एकदा 'लोकमत डॉट कॉम'वर विश्वासाची आणि पसंतीची मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या आणि वाचकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलेल्या लोकमत माध्यमसमूहाची वेबसाईटही 'डिजिटल न्यूज मीडिया'त वाचकसंख्येचे नवनवे उच्चांक गाठत आहे. जून महिन्यात तब्बल ६ कोटी २१ लाख ५३ हजाराच्या विक्रमी वाचकसंख्येसह 'लोकमत डॉट कॉम'ने अव्वल स्थान पटकावून मराठी माध्यमविश्वात आपला दबदबा सिद्ध केला आहे. आजवर कुठल्याही मराठी न्यूज वेबसाईटला एवढी मोठी मजल मारता आलेली नाही आणि ही वाचकांच्या 'लोकमत'वरील प्रेमाची पावतीच आहे.  (Lokmat.com No. 1 Marathi News Website as per Comscore)

देशभरातील विविध भाषांमधील वेबसाईट्सचं मूल्यमापन करणाऱ्या कॉमस्कोअर या संस्थेनं जून महिन्याचा डेटा नुकताच प्रसिद्ध केला. त्यातून लोकमतचं जाळं किती मजबूत विणलं गेलंय आणि वाचकांचं लोकमतशी किती घट्ट नातं आहे, याची प्रचिती येते. 'टोटल डिजिटल पॉप्युलेशन' या अंतर्गत 'लोकमत डॉट कॉम'च्या नावावर ६,२१,५३,००० इतके व्हिजिटर्स आहेत. दुसऱ्या क्रमांकावर टीव्ही ९ मराठी वेबसाईट आहे. त्यांचे व्हिजिटर्स आहेत, २ कोटी २६ लाख. म्हणजेच अव्वल क्रमांकावरील लोकमत आणि दुसऱ्या क्रमांकावरील वेबसाईटमध्ये जवळपास ४ कोटी व्हिजिटर्सचं अंतर आहे. २ कोटी २० लाख व्हिजिटर्ससह एबीपी माझाची वेबसाईट तिसऱ्या क्रमांकावर आहे.

युजर्स/व्हिजिटर्स (वाचक), पेजव्ह्यूज (वाचकांनी वाचलेली पाने), व्हिजिट्स (वाचकांनी साईटला किती वेळा भेट दिली), मिनिट्स पर व्हिजिटर (प्रत्येक भेटीवेळी वाचक किती मिनिटं साईटवर थांबला), टोटल मिनिट्स (एकूण किती मिनिटं वेबसाईट वाचली गेली) अशा विविध निकषांच्या आधारे कॉमस्कोअर ही संस्था वेबसाईट्सचं मूल्यमापन करते आणि प्रत्येक महिन्याचे आकडे जाहीर केले जातात. याच आकडेवारीनुसार, सलग ४० महिने पहिल्या क्रमांकावर राहण्याचा विक्रमही 'लोकमत डॉट कॉम'च्या नावावर आहे. 

धन्यवाद वाचकहो!

राज्यातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड जलद गतीने, कुठलीही रंगवारंगवी आणि बनवाबनवी न करता, तटस्थ - निष्पक्षपातीपणे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. वाचकांची रुची-अभिरुची ओळखून, त्यांना केंद्रस्थानी ठेवून 'लोकमत डॉट कॉम' काम करतंय. 'लोकमत डॉट कॉम' या मुख्य पोर्टलसोबतच लोकमत सखी, लोकमत फिल्मी, लोकमत भक्ती, लोकमत मनी, लोकमत ॲग्रो या मायक्रोसाईट्स त्या-त्या विशिष्ट विषयांना वाहिलेल्या आहेत. या सर्व वेबसाईट्सवर वाचकांचं मनापासून प्रेम आहे, विश्वास आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!

Web Title: lokmat number one marathi news website as per comscore MMX Multi-Platform june data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.