वाचकांच्या पाठबळावर पुण्यात ‘लोकमत’ नंबर 1

By Admin | Updated: August 5, 2016 00:24 IST2016-08-05T00:24:55+5:302016-08-05T00:24:55+5:30

वाचकांच्या भक्कम पाठबळावर महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रथम क्रमांकाचे ‘लोकमत’ पुण्यातही क्रमांक एकचे दैनिक झाले आहे.

'Lokmat' number 1 in Pune on the readers' support | वाचकांच्या पाठबळावर पुण्यात ‘लोकमत’ नंबर 1

वाचकांच्या पाठबळावर पुण्यात ‘लोकमत’ नंबर 1


पुणे : वाचकांच्या भक्कम पाठबळावर महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रथम क्रमांकाचे ‘लोकमत’ पुण्यातही क्रमांक एकचे दैनिक झाले आहे. वाचकसंख्येत ‘लोकमत’च नंबर एक आहे. ‘हंसा रिसर्च’ने पुण्यातील विविध क्षेत्रांतील व विविध वयोगटांतील वाचकांचे सर्वेक्षण करून नंबर १ ची मोहोर ‘लोकमत’वर उमटविली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये १७ वर्षांपूर्वी ‘लोकमत’ची सुरुवात झाली आणि बोथट, कोमट, गुळमुळीत पत्रकारितेपासून वाचकांना एक सशक्त पर्याय मिळाला. दैनंदिन घटना-घडामोडींचे यथार्थ चित्रण, वाचकाभिमुखता, विधायक पण समाजहितासाठी आक्रमक पत्रकारितेचा धडा ‘लोकमत’ने घालून दिला. त्यामुळे ‘लोकमत’ वाचकांच्या पसंतीला उतरले. नागरी समस्यांवर ‘आता बास’चा नारा सर्वांत प्रथम ‘लोकमत’नेच दिला. पत्रकारितेला नवी दिशा देणाऱ्या ‘पत्रकारिता परमो धर्म:’च्या माध्यमातून सिटीझन जर्नालिस्टचा प्रयोग यशस्वी केला. ‘कशासाठी, पुण्यासाठी’ या मोहिमेतून पुण्याचे प्रश्न ऐरणीवर आणले. पुणेकरांची रोजच्या जगण्याची लढाई अधिक सुसह्य करतानाच ‘व्हिजन पुणे’सारख्या चर्चासत्रातून शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक-व्यावसायिक यांच्यासाठी व्यासपीठ निर्माण केले. पुणेकरांच्या जीवनाचे प्रत्येक अंग व्यापून टाकणारे ‘लोकमत’ दैनिक यामुळे पुणेकरांच्या गळ्यातील ताईत बनले. वृत्तपत्र व्यवसायातील महत्त्वाचा घटक असणारा वृत्तपत्रविक्रेता हा अत्यंत दुर्लक्षित होता. ‘लोकमत’ने सर्वांत प्रथम विक्रेत्यांना बळ दिले. त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरापासून स्टॉल अधिकृत करण्यासाठीच्या मोहिमेत ‘लोकमत’ भक्कमपणे पाठीशी उभे राहिले. ‘लोकमत’ परिवाराचाच एक घटक समजून वृत्तपत्रविक्रेत्यांच्या व्यक्तिगत समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले. ‘लोकमत’ व वाचकांमधील दुवा बनण्याचे काम वृत्तपत्रविक्रेत्यांनी केले. त्यामुळे ‘लोकमत’ पुण्यातील घराघरांत पोहोचले आहे.
हंसा रिसर्चने पुण्यात केलेल्या सर्व्हेत याचेच प्रतिबिंब उमटले. आर्थिक, सामाजिक आदी विविध गटांत ‘लोकमत’ नंबर १चे दैनिक ठरले आहे. ‘हंसा’ ही ग्लोबल मार्केटिंग रिसर्च एजन्सी असून, जगातील विविध ७७ देशांत तिचे काम चालते. फायनान्शिअल, मीडिया, टेक्नॉलॉजी व टेलिकॉम या क्षेत्रांतील सर्व्हेचा प्रदीर्घ अनुभव असलेली ‘हंसा’ विप्रो, लेनेवोसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांसाठी सर्व्हे करते.
>देशभरातील वृत्तपत्रांच्या वाचकसंख्येचा मानदंड मानल्या जाणाऱ्या इंडियन रीडरशिप सर्व्हेचे (आयआरएस) काम करणाऱ्या मीडिया रिसर्च अँड युजर्स कौन्सिल (एमआरयूसी) या संस्थेसोबत हंसा रिसर्च काम करीत आहे. सन २००२ ते २०१२पर्यंत आलेले आयआरएसचे सर्व्हे हंसा रिसर्चनेच केले होते. देशातील सर्व प्रतिष्ठित वृत्तपत्रांसाठी हा सर्व्हे मान्यताप्राप्त आहे. अत्यंत प्रशिक्षित टीम, व्यावसायिक बांधिलकीची नि:स्पृहता, तांत्रिकदृष्ट्या अतिशय प्रगत पद्धती ही हंसा रिसर्चची वैशिष्ट्ये मानली जातात. यामुळे हंसा रिसर्चच्या सर्व्हेला कोणीही सुबुद्ध आव्हान देत नाही.
>लोकमत चॅलेंज
आम्ही या माध्यमातून सर्व वाचकांना आवाहन करतो, की ‘लोकमत’च्या वाचकसंख्येच्या दाव्याबाबत आपल्याला काही शंका असल्यास कधीही, केव्हाही वडगाव बुद्रुक येथील प्रिंटिंग प्रेसला आपण प्रत्यक्ष थेट भेट देऊ शकता. वृत्तपत्राच्या छपाईचे काम रात्रीच चालते, याची आपल्याला कल्पना आहे. आपण ०२०-६६८४८५८६ या क्रमांकावर फोन करा. आम्ही आपल्याला प्रिटिंग प्रेस दाखवू. प्रेसमधून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील आपण म्हणाल त्या कोणत्याही वितरण केंद्रांवर घेऊन जाऊ. त्या ठिकाणी आपण कोणत्याही विक्रेता बांधवाशी थेट संवाद साधू शकता. खपाबाबत आपल्या शंकांचे प्रत्यक्ष निरसन करू शकता. आजपर्यंत अशा प्रकारचे आव्हान कोणत्याही वृत्तपत्राने दिलेले नाही; परंतु वाचकांप्रति असलेल्या बांधिलकीला ‘लोकमत’ अत्युच्च प्राधान्य देते. त्यामुळेच हे आवाहन आम्ही सन्माननीय वाचकांना करीत आहोत.
>हंसा रिसर्चने पुण्यात केलेल्या सर्व्हेसाठी वाचकसंख्येबरोबरच वृत्तपत्राची विश्वासार्हता,
वाचकांशी जुळलेली नाळ, लोकशिक्षणाचे माध्यम म्हणून वृत्तपत्राचे स्थान, वाचकांना दैनंदिन
घटना-घडामोडींविषयी अपटुडेट ठेवण्याची क्षमता यांबाबतही विविध प्रश्न विचारले होते. ‘लोकमत’ पुण्यातील अन्य कोणत्याही वृत्तपत्रापेक्षा या सर्व बाबींमध्ये आघाडीवर असल्याचे सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे. वाचकांप्रति बांधिलकी आणि वृत्तपत्र हे समाजशिक्षणाचे एक माध्यम मानणाऱ्या ‘लोकमत’च्या शिरपेचात या सर्र्व्हेमुळे मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Web Title: 'Lokmat' number 1 in Pune on the readers' support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.