शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; उद्योजकतेबरोबर सामाजिक भान जपणाऱ्या हातांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 18:13 IST

पर्यावरण रक्षणापासून ग्रामिण भागातील शिक्षणापर्यंत हे उद्योग योगदान देत आहेत.

मुंबई- केवळ नफानिर्मिती हे उद्योगांचं ध्येय नाही तर आपण समाजाचं काही देणं लागतो अशा विचारांनी अनेक उद्योग कार्यरत आहेत. पर्यावरण रक्षणापासून ग्रामिण भागातील शिक्षणापर्यंत हे उद्योग योगदान देत आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या विभागातील नामांकनांतून मत देण्यासाठी http://lmoty.lokmat.com/vote.php येथे लॉग इन करा.

बजाज इलेक्ट्रीकल्स- ज्ञानदीप विद्यालय प्रकल्पबजाजच्या कर्मचाऱ्यांनी नेहमीच सीएसआर प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला आहे. आपल्याकडील असणाऱ्या कौशल्यांचा वापर करुन समुदायांच्या उत्थानासाठी काम केलं आहे. कन्झ्युमर प्रोडक्ट मार्केटिंग टीमच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रातील खेड तालुक्यातील शिवे गावातील ज्ञानदीप विद्यालय दत्तक घेतले आहे. या शाळेमध्ये विविध योजना तडीस जाव्यात यासाठी हे कर्मचारी, सीएसआर विभाग, ज्ञानदीप विद्यालय आणि विद्यार्थी एकत्र येऊन काम करत आहेत. या कार्यक्रमामार्फत पौगंडावस्थेतील मुलांना प्रशिक्षण, तंबाखू नियंत्रण मोहीम, शाळेच्या ग्रंथालयाला पुस्तके देणे, विज्ञान उपकरणे देणे, क्रीडासंस्कृती वाढवणे आणि शाळेची एकूणच प्रगती साध्य करणे असे प्रकल्प हाती घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, प्रशासन, पालक, मुले आणि शाळेजवळील सर्व गावकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. मुलांमध्ये नेतृत्वगुण वाढीस लागण्यासाठीही हा प्रकल्प मदत करत आहे.बजाज इलेक्ट्रीकल्सला निवडण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php

आयसीआयसीआय फाऊंडेशन- आर्थिक साक्षरता प्रकल्प आयसीआयसीआय आपल्या ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे ग्रामिण भागातील बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचली असून आर्थिक साक्षरतेचा प्रकल्प राबवित आहे. यामध्ये १२ तासांचे प्रशिक्षण देण्यात येते. आयसीआयसीआयच्या आरएसईटीआयच्याद्वारे केल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांमधील महत्त्वाचा भाग आहे. तरुणांना दृकश्राव्य माध्यमं, फ्लीप चार्ट, खेळ, सेल्फ अॅनालिसिस प्रश्नावलीचा या कार्यक्रमात समावेश आहे. वेळोवेळची बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नोंदी करून योग्य आर्थिक सवयी लावून घेण्याबद्दल या कार्यक्रमात माहिती दिली जाते. त्यामुळे अनेक प्रशिक्षणार्थी आज अर्थसाक्षर झाले आहेत.आयसीआयसीआय फाऊंडेशनला निवडण्यासाठी -http://lmoty.lokmat.com/vote.php

जेएसडब्ल्यू एनर्जी- पर्यावरण विषयक कार्य जेएसडब्ल्यू फाऊंडेशनने शाश्वत पर्यावरणासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. पिण्यायोग्य शुद्ध पाणी मिळवण्यासाठी सर्वात जास्त धडपड स्त्रिया आणि मुलींना करावी लागते. त्यामुळे तात्कालिक आणि दीर्घकालीन योजनांद्वाारे पिण्यायोग्य पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी फाऊंडेशद्वारे प्रयत्न केले जात आहे. यासाठी महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवार योजनेतही सहभाग घेतला आहे. त्याचप्रमाणे फाऊंडेशनद्वारे ग्रामिण भागामध्ये शौचालयेही बांधण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत शाळांमधील शौचालयांची दुरुस्ती करून मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जयगड आणि डोलवी येथे मॅनग्रोव्हच्या संरक्षणासाठी कार्य करून तेथील जैवविविधता जपण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. 2016 साली पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ५१ व्यक्तींना अर्थकेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जेएसडब्ल्यू एनर्जीला निवडण्यासाठी-http://lmoty.lokmat.com/vote.php

के. सी महिंद्र एज्युकेशन ट्रस्ट- मुलींच्या शिक्षणासाठी नन्ही कली प्रकल्प महिंद्र आणि महिंद्र या कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्र या प्रकल्पाचे संस्थापक आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी नेहमीच कार्य केले आहे. सुशिक्षित महिला या कोणत्याही समाजाच्या आणि लिंगसमानता असणाऱ्या समाजाच्या मह्त्त्वाच्या भाग आहेत यावर त्यांचा विश्वास आहे. महिलांना शिक्षणाद्वारे अगदी लहान वयापासूनच सक्षम केल्यास त्याचा फायदा राष्ट्राला होतो असं त्यांचं मत आहे. महिलांच्या शिक्षणात केलेल्या गुंतवणुकीपेक्षा दुसरी कोणतीही गुंतवणूक जगाच्या दृष्टीने अधिक लाभदायक नाही असं मत जागतिक बँकेनेही व्यक्त केलेलं आहे. मुलींच्या शिक्षणामुळे कुपोषण, बाळंतपणात होणारे मृत्यू यात घट होते आणि मुलांचे आरोग्य, पोषण सुधारुन आर्थिक प्रगती होते असंही जागतिक बँकेने नमूद केलं आहे. के. सी. एज्युकेशन ट्रस्ट सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षित कुटुंबातील मुलींना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात आणि त्यांचं शिक्षण सोडून देण्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातील मुलींच्या शिक्षणाची वृद्धी व्हावी काम करु पाहाणाऱ्या इच्छुकांनाही के. सी. महिंद्र एज्युकेशन ट्रस्ट आणि नन्ही कली प्रकल्प संधी देतो.के. सी. महिंद्र एज्युकेशन ट्रस्टला निवडण्यासाठी-http://lmoty.lokmat.com/vote.php

प्रॉक्टर अँड गॅम्बल- शिक्षण प्रकल्प- पढेगा इंडिया, बढेगा इंडिया प्रॉक्टर अँड गॅम्बलच्या ' शिक्षा' या प्रकल्पाचे हे ८वे वर्ष आहे. आजवर २ लाख ८० हजार विद्यार्थ्यांना या प्रकल्पामुळे शिक्षणाची संधी मिळाली आहे. विविध एनजीओच्या मदतीने भारतात या प्रकल्पाच्याअंतर्गत १४० शाळांची उभ्या राहिल्या आहेत. स्थापनेपासून या प्रकल्पामधून २२ कोटी रुपयांच्या देणग्या देण्यात आल्या आहेत. भारतामध्ये सर्वांना 100 टक्के शिक्षण मिळावे असं फाऊंडेशनचं मूळ ध्येय आहे. या प्रकल्पाला अनुपम खेर, सुष्मिता सेन, सैफ अली खान, शर्मिला टागोर, आर. माधवन, अभय देओल, कोंकोणा सेन, तब्बू, सोहा अली खान, डॉ. किरण बेदी, जतीन दास अशा अनेक मान्यवरांनी मदत केलेली आहे.प्रॉक्टर अँड गॅम्बलला निवडण्यासाठी-http://lmoty.lokmat.com/vote.php

टॅग्स :Lokmat Maharashtrian Of The Year 2018लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८