शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे सर्वांत लाडके ३ मंत्री कोणते?; जयंत पाटलांचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी योजनाच जाहीर करून टाकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 19:32 IST

LMOTY 2025: जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातील तुमचे लाडके तीन मंत्री कोण, असा प्रश्न विचारला होता.

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा म्हणून 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्कार सोहळ्याकडे पाहिलं जातं. हा पुरस्कार सोहळा आज मुंबईतील राजभवन इथं पार पडत असून या सोहळ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतलेली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत रंगली. या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंत पाटलांच्या विविध प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तर देत जोरदार फटकेबाजी केली. यावेळी जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळातील तुमचे लाडके मंत्री कोण, असाही प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मी आता लाडका मंत्री योजना जाहीर केल्याचं मिश्किलपणे सांगतले. 

नागपूरमध्ये निर्माण झालेल्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना बोलावून तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये करू नयेत, याबाबत तंबी दिल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री असल्याचं सांगत त्यांनी मला कसलीही तंबी न दिल्याचा खुलासा नितेश राणे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्‍यांना हा प्रश्न विचारण्यात आला.

मु्ख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

तुमच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री काल म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांचा सर्वांत लाडका मंत्री आहे. मंत्रिमंडळातील तुमचे सर्वांत लाडके तीन मंत्री कोणते आहेत? असा प्रश्न जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, "मी आता मुख्यमंत्री लाडका मंत्री योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या निकषात जे बसतील ते लाडके मंत्री ठरतील."

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मिश्किल उत्तरावर जयंत पाटील यांनीही टिपण्णी करत "आता या योजनेत सामील होण्यासाठी मंत्र्यांची स्पर्धा लागेल" असं म्हटलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसlokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा