शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2025: 'डीसीएम झाल्याची मला नाही खंत, पण अचानक शांत झाले का जयंत'; एकनाथ शिंदेंची टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 21:11 IST

Eknath Shinde on Jayant Patil: आज मुंबईत 'लोकमत'च्या महासोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महामुलाखत घेतली.

Maharashtra Politics ( Marathi News ) : आज मुंबईत 'लोकमत'च्या महासोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महामुलाखत घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना टोले लगावले. 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावरुन उपमुख्यमंत्री होऊन ॲडजस्ट झाले का?, असा प्रश्न विचारत पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला. 

LMOTY 2025: जयंत पाटलांनी विचारले 'वर्षा'वर रहायला कधी जाणार? देवेंद्र फडणवीसांनी तारीखच सांगितली

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार जयंत पाटील यांना डिवचले. बोलताना शिंदे म्हणाले, आम्हीजो उठाव केला त्याला काही कारण होतं. तुम्ही फडणवीसांना हुडी घातली म्हणाला. पण त्यामुळे बऱ्याच लोकांना हुडहुडी भरली आहे.  

"जयंतराव तुम्ही मुलाखतीमध्ये म्हणाला की एक नंबरचे दोन नंबर झाले. पण तसं काही नाही. तु्म्ही प्रश्न विचारण्याच्या बाजूने आहात, मला वाटत होतंतुम्ही उत्तर देण्याच्या बाजूने असाल, असा टोलाही शिंदे यांनी जयंत पाटील यांना लगावला. मी सीएम होतो तेव्हा स्वत:ला कॉमन मॅन समजत होतो. आता मी डीसीएम आहे तरी सुद्धा स्वत:ला डेडीकेटेड टू कॉमन मॅन समजतो. त्यामुळे डीसीएम झाल्याची नाही मला खंत पण अचानक शांत झाले का जयंत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांना लगावला. 

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी अ‍ॅडजस्ट झाले का?

यावेळी मुलाखतीमध्ये जयंत पाटील म्हणाले, काही लोकांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री होण्याची सवय असते. तुम्ही(देवेंद्र फडणवीस) मुख्यमंत्री होता, पुढे उपमुख्यमंत्री म्हणून अॅडजस्ट झालात. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होऊन अॅडजस्ट झाले का?

या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'मला कळतंय की, तुम्ही(जयंत पाटील) जो तीर सोडलाय की, काही लोकांना उपमुख्यमंत्री होण्याची सवय असते, तो अजितदादांच्या नावाने सोडलाय. अजितदादा उपमुख्यमंत्रीपदाचे रेकॉर्ड मोडणार आहेत. काही लोक त्यांना कायम उपमुख्यमंत्री म्हणतात. ते कायम उपमुख्यमंत्री राहावे असं काही नाही, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत,' असं फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025Lokmat Eventलोकमत इव्हेंटJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे