LMOTY 2025: यावर्षी कोणते 'गुरुजी' ठरणार 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'?, 'शिक्षक' कॅटेगरीतील नामांकने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:05 IST2025-02-26T15:04:03+5:302025-02-26T15:05:00+5:30
महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स.

LMOTY 2025: यावर्षी कोणते 'गुरुजी' ठरणार 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'?, 'शिक्षक' कॅटेगरीतील नामांकने...
महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट-अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावर्षी या पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, शिक्षक कॅटेगरीसाठीची नामांकनं अशी....
कुंदा बच्छाव (मनपा शाळा क्रमांक १८, आनंदवली, जि. नाशिक)
• राज्य शासनाच्या राज्यस्तरीय ७ मॉडेल स्कूलमध्ये त्यांनी आपल्या शाळेचा समावेश केला.
• महापालिका शाळेची पटसंख्या ४३० वरून ८०० पर्यंत नेली.
• जर्मन संस्थेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे अध्ययन करण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली.
• आठवीनंतरच्या गरजू व हुशार मुलींचे शैक्षणिक पालकत्व घेण्याच्या उद्देशाने कर्मदान फाउंडेशनची स्थापना केली.
■ बच्छाव यांनी १३० विद्यार्थिनी दत्तक घेतल्या. त्यापैकी दोन मुली सीए फायनल, दोन मुली अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत.
ज्ञानेश्वर सोनवणे (जिल्हा परिषद शाळा, पिलखेडे, जि. जळगाव)
• सोनवणे यांनी कच्च्या केळीपासून विद्यार्थ्यांना विविध पदार्थ बनवायला शिकवले.
• आधुनिक युगात विद्यार्थ्यांसाठी शाळेतच डिजिटल शिक्षणाची व्यवस्था केली.
■ शाळेत ३० टॅब आणले. त्याच्या माध्यमातून स्प्रे मारणे, विद्यार्थ्यांना डिजिटल तासिकेची सुविधा उपलब्ध केली.
■ त्यांचे विद्यार्थी आता टॅबद्वारे अध्ययन करतात. प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही असून विद्यार्थी स्वयं अध्ययन करून त्यावर प्रश्न-उत्तरे तयार करतात.
• घर घर संविधान उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाचे दररोज वाचन केले जाते.
• विद्यार्थ्यांना संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये समजून घेण्यासाठी त्याचे महत्त्व पटवून दिले जाते.
संदीप पवार (जिल्हा परिषद शाळा)
• बीड जिल्ह्यातील जरेवाडी येथील ऊसतोड मजुरांचे स्थलांतर
■ १९९५ पर्यंत जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत एक शिक्षक शाळेची पटसंख्या केवळ २४ होती.
• शाळेचा कायापालट करून २५ वर्गखोल्या असून २० शिक्षक आणि ८०० विद्यार्थी आहेत.
• जरेवाडीतील ५० मुले आणि ७५० मुले अन्य खेडेगावातील आहेत.
■ १० वर्षात ४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. विद्यार्थ्यांचे स्थलांतर शून्य टक्के आणले.
• मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत बीड जिल्ह्यात शाळा प्रथम आणि विभागात तृतीय येऊन ११ लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले.
• आय.एस.ओ. मानांकन मिळविणारी बीड जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे.
शंकर लेकुळे (जिल्हा परिषद शाळा, सांडस, जि. हिंगोली)
• ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा उंचावण्यासाठी
परदेशातील शिक्षकांशी संवाद साधला. ऑनलाइन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ५३ देशांतील २११ पेक्षा जास्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी येथील ग्रामीण विद्यार्थ्यांचा संवाद घडविला.
• विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण पद्धती, शाळा, वर्ग खोल्या, शैक्षणिक साहित्याची ओळख.
■ कोंढुर जिल्हा परिषदेच्या शाळेतील १० मुलींनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आझादी सॅटेलाइट तयार केला. अशी सॅटेलाइट बनविणारी शाळा ही महाराष्ट्रातील पहिली शाळा ठरली.
• कोरोनाकाळात शिक्षण सुरू राहण्यासाठी ७८९ ऑनलाइन चाचण्या तयार केल्या.
राज्यातील ९ लाख विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते.
• राज्यातील ८ लाख शिक्षक, पालक शंकर लेकुळे यांच्या संकेतस्थळाचा वापर करीत आहेत.
तानाजी रोंगे (जिल्हा परिषद शाळा, पारूनगर, जि. लातूर)
■ केवळ २३ पटसंख्या असणाऱ्या २ शिक्षकी जिल्हा परिषद शाळेचे ११२७ पटसंख्या व ३० शिक्षक असणाऱ्या शाळेत रूपांतर.
• जवाहर नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती परीक्षा व इतर अनेक स्पर्धा परीक्षांतून शेकडो विद्यार्थी यशस्वी.
• लातूर जिल्ह्यात सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीपासून सेमी इंग्रजी माध्यम सुरू केले.
• तानाजी रोंगे सर युट्यूब चॅनेलमधून राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन.
• चला सोडवू या हे गणित या विशेष सदराचा लाखो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.
ज्यांची नामांकने झाली आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराः https://lmoty.lokmat.com/