शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

LMOTY 2025: कायद्याचं राज्य राहावं म्हणून धडपडणारे अधिकारी; कोण ठरणार प्रॉमिसिंग आयपीएस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:38 IST

Lokmat Maharashtrian of the year Awards 2025: लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावर्षी या पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, आयपीएस प्रॉमिसिंग या कॅटेगरीसाठीची नामांकनं अशी....

डॉ. दीक्षित गेडाम (डीसीपी झोन ९, मुंबई)

- गेल्या काही महिन्यांत मुंबईतील वांद्रे व परिसरात झालेल्या अनेक संवेदनशील प्रकरणांचा तपास केला.- सलमान खान गोळीबार प्रकरण,- बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरण.- सैफ अली खान हल्ला प्रकरण.- उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या हत्येचा अवघ्या काही तासांत उलगडा.- रणवीर, रैनाची चौकशी प्रकरण.- मुंबईत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या परिमंडळ ८ आणि आता ९ ची जबाबदारी ते सांभाळत आहेत.

महेंद्र पंडित (जिल्हा पोलिस अधीक्षक, कोल्हापूर)

- बॅच - २०१३- राजकीय आणि सामाजिक संवेदनशील परिस्थितीत संयमाने काम करण्याची हातोटी.- पोलिसांच्या कल्याणाकडे लक्ष, गृहबांधणी प्रकल्प पूर्ण करण्यात सातत्याने पाठपुरावा.- प्रसिद्धीपासून दूर, राजकीय दबाव न घेता योग्य तथा कायदेशीर बाबी सांभाळत धडाडीने निर्णय.- अनेक गुन्हे शोधण्याची यशस्वी मोहीम.

नवनीत कॉवत (जिल्हा पोलिस अधीक्षक, बीड)

- बॅच - २०१७- आयआयटीमधून इंजिनीअर झाल्यानंतर एका आंतरराष्ट्रीय कंपनीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून भारतीय पोलिस सेवेत दाखल झाले.- खंडणी, हत्या, आंदोलन, जातीय दंगलींमुळे सध्या चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात जिल्हा पोलिस प्रमुख पदाचा कार्यभार सांभाळला.- पोलिसांतील दरी दूर व्हावी याकरिता सर्व श्रेणीतील अधिकाऱ्यांना आडनावाने हाक मारण्याची प्रथा बंद केली. त्यांच्यासह सर्व अधिकारी व शिपायांना पहिल्या नावाने हाक मारण्याची प्रथा सुरू केली.- तक्रारदारांना योग्य व जलद पोलिस सेवा मिळावी म्हणून पोलिस ठाण्यांमध्ये क्यूआर सिस्टीम सुरू केली.- लोणावळा येथे कार्यरत असताना गांजा तस्करीच्या देशपातळीवरील रॅकेटचा त्यांनी पर्दाफाश केला.

राकेश ओला (जिल्हा पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर)

- मूळ राजस्थान येथील असलेले ओला २००५ मध्ये न्यायाधीश होते.- २०१२ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत आयपीएस बनले.- २२ ऑक्टोबर २०२२ पासून ते अहिल्यानगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत. जिल्ह्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केला.- पोलिसांसाठी ६९३ निवासस्थाने मंजूर केली.- राहुरी येथील वकील दाम्पत्याची हत्या, नगर शहरातील राजकीय हत्या, अंगणवाडी सेविकेचा खून, शिर्डी येथील दुहेरी हत्याकांड हे गुन्हे तत्काळ उघडकीस आणून कायदा सुव्यवस्था राखली.- अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी २०२३ मध्ये १२५, तर २०२४ मध्ये २२६ गुन्हे दाखल केले.

विशाल आनंद (दीनानाथ, जिल्हा पोलिस अधीक्षक, अमरावती)

- बॅच - २०१४- अमरावती येथे जिल्हा पोलिस अधीक्षकपदावर रूजू होण्यापूर्वी ते नागपूर येथे नक्षलविरोधी अभियान विशेष कृती दलाचे अधीक्षक होते.- गुटखा व वाळू तस्करांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करत त्यांच्यावर वचक मिळवण्यात त्यांना यश आले.- अनेक कारवायांमुळे जिल्ह्यातील बॉडी ऑफेन्सच्या प्रकारांना आळा घालण्यात त्यांना यश आले.- एटीएम फोडणारी टोळी जेरबंद करण्यात मोठे यश त्यांनी मिळवले.- पोलिसांमध्ये व्यसनमुक्ती व्हावी यासाठी ते विविध उपक्रम राबवत आहेत.

ज्यांना नामांकने मिळाली आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराः https://lmoty.lokmat.com/ 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024Mumbaiमुंबईkolhapurकोल्हापूरBeedबीडAhilyanagarअहिल्यानगरAmravatiअमरावती