शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘लोकमत’ने पूर्वीच दिला होता इशारा

By admin | Updated: August 4, 2016 05:30 IST

गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाडपासून ४ कि.मी. अंतरावरील बिरवाडी हद्दीतील सावित्री नदीवरील ब्रिटिश सरकारच्या राजवटीत १९२८ मध्ये राजेवाडी पूल बांधण्यात आला होता.

जयंत धुळप/ सिकंदर अनवारे,

महाड- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाडपासून ४ कि.मी. अंतरावरील बिरवाडी हद्दीतील सावित्री नदीवरील ब्रिटिश सरकारच्या राजवटीत १९२८ मध्ये राजेवाडी पूल बांधण्यात आला होता. सुमारे ८८ वर्षांचा जुना राजेवाडी पूल मंगळवारी सावित्री नदीच्या पुरात वाहून गेला. या अपघातास शासन तसेच विशेष करून राष्ट्रीय महामार्ग विभागाचा अक्षम्य बेजबाबदारपणाच कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे.महाड-पोलादपूरला जोडणाऱ्या या पुलाच्या दुरवस्थेकडे ‘लोकमत’ने तीनवर्षांपूर्वीच ३ सप्टेंबर २०१३ रोजीच्या ‘हॅलो रायगड’ या पुरवणीत वृत्त दिले होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील या पुलाची ‘वापर मुदत’ संपल्याचे ब्रिटिश एजन्सीने संबंधित यंत्रणेला सूचित केल्याच्या वृत्ताला देखील तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला होता. पुलाच्या दगडी बांधकामामध्ये वड-पिंपळाच्या झाडाचे रान पसरले होते. वड-पिंपळाच्या झाडांची मुळे पुलाच्या दगडांमध्ये खोलवर रु जल्याने दगडी बांधकामामध्ये भेगा पडून ते ढासळू लागले होते. संरक्षण कठड्यांचे काही दगड ढासळले होते. महाड-बिरवाडी , लोटे-परशुराम आणि रत्नागिरी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमुळे येथील कारखान्यांना कच्चामाल घेवून जाणारी व तयार माल आणणाऱ्या अवजड वाहनांची मोठी वाहतूक या पुलावरून सुरू असायची. मंगळवारी झालेल्या या पुलाच्या दुर्घटनेचे निरीक्षण करता एक बाब लक्षात आली. ती म्हणजे या पुलाचे खांब (पिलर्स) जागेवर आहेत, ते पूर्णपणे वाहून गेलेले नाहीत. सावित्री नदीच्या पाण्याची वाढलेली पातळी आणि वाहणाऱ्या पाण्याचा वेग याच्या मोठ्या दाबामुळे पुलाचा वरचा भाग(डेक) हा तुटून नदीत पडला आहे. तीन वर्षांपूर्वी या पुलाच्या धोक्याची कल्पना ‘लोकमत’ने बातमीतून दिली होती. जलदाब सहनशीलता मर्यादेचे उल्लंघन झाल्याने पूल कोसळला असल्याचे सुकृतदर्शनी दिसून येत असल्याचा निष्कर्ष शासनाच्या शहर नियोजन विभागातील माजी अधिकारी पी.एन.पाडलीकर यांनी सांगितले.>सावित्री नदीवरचा हा पूल वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील ३६ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.परंतु मुळात धोकादायक पुलांची तपासणी आपत्ती निवारण योजनेअंतर्गत पावसाळ््यापूर्वी का करण्यात आली नाही, अशा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोवा राष्ट्रीय महामार्गाची धोकादायक दुरवस्था गेल्या १० ते १५ वर्षांपासून ‘लोकमत’सह विविध प्रसिध्दी माध्यमांनी सातत्याने मांडली होती. तरीही कार्यवाही कधीही झाली नाही.