लोकमत एक्सक्लुझिव्ह : हाथ चलाखीने दागिने चोरणा-या 'ज्येष्ठ नागरिक' टोळीला अटक

By Admin | Updated: August 31, 2016 11:41 IST2016-08-31T11:37:42+5:302016-08-31T11:41:16+5:30

सोनाराच्या दुकानात जाऊन हाथ चलाखीने दागिन्यांची चोरी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या टोळीला मंगळवारी रात्री कुरार पोलिसांनी अटक केली

Lokmat Exclusive: 'Senior Citizen' group arrested for cheating jewelery | लोकमत एक्सक्लुझिव्ह : हाथ चलाखीने दागिने चोरणा-या 'ज्येष्ठ नागरिक' टोळीला अटक

लोकमत एक्सक्लुझिव्ह : हाथ चलाखीने दागिने चोरणा-या 'ज्येष्ठ नागरिक' टोळीला अटक

>गौरी टेंबकर - कलगुटकर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ -  सोनाराच्या दुकानात जाऊन हाथ चलाखीने दागिन्यांची चोरी करणाऱ्या एका टोळीला मंगळवारी रात्री कुरार पोलिसांनी अटक केली. तर त्यांचे दोन साथीदार फरार झाले असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वासुदेव शिंदे (६०), विठोबा पवार (६५), विजय पवार (६५) ,विजयची पत्नी गंगुबाई (६५) आणि विमल जाधव (६०) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. या सर्वांनी मुंबईसह ठाण्यातही अशाच प्रकारे दागिन्यांची चोरी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या सर्वांवर कुरार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांचे दोन फरार साथीदार सतीश शिंदे (३०) आणि ज्ञानेशवर शिंदे(६५) हे साथीदार फरार असुन यांचाही शोध पोलीस घेत आहेत. त्यानी मालाडमधील ज्वेलर्सच्या दुकानातुन जवळपास एक लाख रुपये किमतीची सोन्याची चैन चोरी केली होती जी पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्याचे कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लिंबन्ना व्हनमाने यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.

Web Title: Lokmat Exclusive: 'Senior Citizen' group arrested for cheating jewelery