शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

लोकसभेसाठी विधान परिषदेचे लॉलीपॉप; रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी चुरस

By यदू जोशी | Updated: April 24, 2024 10:18 IST

जूनमध्ये होणाऱ्या निवडणुकीवर राज्यातील अनेक इच्छुकांची नजर

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी येत्या जूनमध्ये निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत विविध मतदारसंघांमध्ये राजकीय तडजोडींचा भाग म्हणून बड्या नेतेमंडळींकडून अनेकांना विधान परिषदेचा लॉलीपॉप सध्या दिला जात आहे. 

लोकसभेला आम्हाला मदत करा, विधान परिषदेत तुम्हाला संधी देऊ, असा शब्द दिला जात आहे. एखाद्या स्थानिक नेत्याला विधानसभेत ‘ॲडजेस्ट’ करणे स्थानिक राजकीय परिस्थितीमुळे शक्य नसेल तर त्याला विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन दिले जात आहे. 

विधान परिषदेचे नीचांकी संख्याबळविधान परिषदेची एकूण सदस्य संख्या ७८ इतकी आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागा अद्याप भरलेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर पाठवावयाच्या नऊ जागा आधीपासूनच रिक्त आहेत. आणखी १० जागा लवकरच रिक्त होणार आहेत. या १० जागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून गेलेले आमदार आणि शिक्षक व पदवीधर मतदारसंघांतून निवडून गेलेल्या आमदारांचा समावेश आहे. 

...तर विद्यमान आमदारांपैकी काहींचा पत्ता कट होणारकाही ठिकाणी संभाव्य बंड थंड करण्यासाठी, काही ठिकाणी ४०-५० हजार मतांची ताकद राखणाऱ्या नेत्याला आपल्या जवळ ठेवण्यासाठी ‘जूनमध्ये विधान परिषदेची निवडणूक आहे, तिथे तुम्हाला संधी देऊ’ असा परस्पर सामंजस्य करार केला जात आहे. ११ आमदारांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत २७ जुलैला संपणार आहे. साधारणत: मुदत संपण्याच्या एक महिना आधी ही निवडणूक होते. हे लक्षात घेता जूनअखेर ११ जागांची निवडणूक होईल. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागेल, त्यानंतर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० जूनपासून सुरू होणार आहे. या अधिवेशन काळात किंवा ते संपल्यानंतर लगेच विधान परिषदेची निवडणूक होईल. आमदारकीचा शब्द ज्यांना दिला गेला आहे त्यांना खरेच संधी दिली गेली तर सध्याच्या ११ आमदारांपैकी काहींना पुन्हा संधी नाकारली जाऊ शकते. 

काही आमदार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 

यावेळी काही आमदार लोकसभा निवडणूक लढत आहेत. त्यातील ज्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि तो विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला आहे असे जर लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले तर ते कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसतील. मात्र, लोकसभा लढत असलेल्या बहुतांश आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. ते जिंकले तर आमदार म्हणून कायम राहायचे की, खासदार म्हणून याचा निर्णय त्यांना नवीन लोकसभेची मुदत सुरू झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत करावा लागेल. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे, ते आता राज्यसभेचे सदस्य आहेत. गोवर्धन शर्मा, अनिल बाबर व राजेंद्र पाटणी या विधानसभा सदस्यांचे निधन झालेले आहे. हे लक्षात घेऊन मतांचा कोटा ठरेल.  

‘या’ आमदारांची २७ जुलै रोजी संपणार मुदत बाबा दुर्राणी (अजित पवार गट), वजाहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), मनीषा कायंदे (शिंदेसेना), अनिल परब (उद्धवसेना), भाई गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), जयंत पाटील (शेकाप) आणि महादेव जानकर (रासप). 

कसा असतो मतांचा कोटा?विधानसभेचे आमदार या विधान परिषद निवडणुकीत मतदार असतात. विजयासाठी किती मते मिळवावी लागणार, याचा कोटा निश्चित केला जातो. प्रत्यक्ष मतदानातील वैध मते गुणिले १०० भागिले रिक्त जागा, अधिक २ या सूत्रानुसार हा कोटा निश्चित केला जातो. महायुतीचे विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता ११ पैकी ८ जागा ते जिंकू शकतात. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाMahayutiमहायुती