शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक 2024: राज ठाकरेंसाठी तीन पर्याय? दोन-तीन दिवसांत चित्र होणार स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 12:57 IST

Raj Thackeray at Lok Sabha Election 2024: राज ठाकरे महायुतीत सामील होण्याच्या चर्चा ऐन रंगात आलेल्या असताना आता एक नवीनच समीकरण समोर आले आहे. त्यात ३ पर्याय त्यांच्यापुढे ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Raj Thackeray at Lok Sabha Election 2024: लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मनसे आणि शिवसेनेचे विलीनीकरण करून शिवसेनेचे अध्यक्षपद तुम्ही घ्या नाहीतर लोकसभेला मनसेने महायुतीला पाठिंबा द्यावा आणि विधानसभेला सन्मानजनक जागा देऊ अन्यथा लोकसभेला एकदोन जागा देऊ आणि विधानसभेला मात्र कमी जागा देऊ असे तीन पर्याय भाजप आणि शिवसेनेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर ठेवण्यात आले असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

  • तीन पर्याय कोणते?
  1. शिवसेनेसोबत विलिनीकरण
  2. लोकसभेला पाठिंबा आणि विधानसभेत वाटा
  3. लोकसभेला जागा, विधानसभेत कमी

राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दिल्लीत अलीकडेच भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते दोनवेळा भेटले. फक्त लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा द्यायच्या एवढाच मर्यादित विषय नव्हता, तर राज यांना महायुतीसोबत नेहमीसाठी कसे आणता येईल या दृष्टीने व्यापक चर्चा सुरू असल्याने शिंदे, फडणवीस, राज यांच्यापैकी कोणीही माध्यमांसमोर स्पष्ट सांगायला तयार नाही असे बोलले जात आहे.

शिंदे-राज एकत्रित समीकरण

- शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि मनसे यांचे विलीनीकरण हा विषय दोन्हीतिन्ही बैठकांमध्ये चर्चिला गेला. त्या बाबत राज यांनी कोणताही शब्द दिला नाही. ते या प्रस्तावासाठी अनुकूल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.- उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला शह द्यायचा असेल तर शिंदे-राज यांनी एकत्र आले पाहिजे. असे एकत्रित समीकरण ठाकरेंसाठी मोठे आव्हान उभे करू शकेल आणि त्या निमित्ताने ठाकरेंना ठाकरेंचे आव्हान उभे करता येईल, असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सूचित केले असल्याची माहिती आहे.

केवळ जागावाटपाची चर्चा करण्यासाठी राज ठाकरे गेले असते तर गतकाळात मनसेने वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मिळविलेली मते किती होती याची माहिती सोबत घेतली असती. शिवाय दिल्लीला जाण्यापूर्वी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांशी त्यांनी भाजप व शिंदेंकडे कोणत्या जागा मागायच्या, त्यासाठी आधार काय असेल या बाबतची चर्चा केली असती पण तसे काहीही त्यांनी केले नाही असे मनसे नेत्यांनी स्पष्ट केले. भाजप, शिवसेना किंवा मनसेच्याही नेत्यांनी या बाबत अधिकृतरित्या बोलण्यास नकार दिला. महायुतीबाबत मनसेचे नेमके काय ठरले हे दोनतीन दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे