शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

"कला नगरचा अब्दुल्ला उमरला खांदयावर घेऊन नाचतोय; काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवणारच"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 11:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवून काश्मीर भारताचा भाग बनवला. आता जम्मू काश्मीरचा वेगाने विकास होत आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

अमरावती - Eknath Shinde on Uddhav Thackeray ( Marathi News ) कला नगरचा एक अब्दुल्ला उमरला खांदयावर घेऊन नाचत आहे. काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनविण्यासाठी राज्य सरकारला जमीन मिळाली आहे. मात्र उमर अब्दुल्ला यांनी मुंबईत येऊन काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवू देणार नाही अशी वल्गना केली. मात्र आमच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भवनाला विरोध करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवणारच असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीका केली. 

अमरावती मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, गृहमंत्री अमित शाह हे रामभक्त आणि हनुमान भक्तही आहेत. काही नेते राज्यात आता फिरु लागले आहेत. ते सुनांवर बोटे मोडू लागले आहेत. अमित शाह यांचे महाराष्ट्रासोबत वेगळे नाते आहे. जावयाचे स्वागत करण्याची महाराष्ट्राची परंपरा असून ती आम्ही कधीही विसरणार नाही. देशाचा कर्तबगार गृहमंत्री महाराष्ट्राचा जावई असल्याचा आम्हाला अभिमान आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच अहंकारी रावणाच्या सरकारने कारवाई करून उमेदवार नवनीत राणा यांना तुरुंगात पाठवले होते. हनुमान यांनी अहंकारी रावणाची लंका जाळली होती. त्याप्रमाणे इथले मतदार महाविकास आघाडी रुपी रावणाच्या लंकेला जाळून राख करतील. नवनीत राणा मताधिक्यांनी विजयी होतील. काश्मीरमधून कलम ३७० हटवणे अशक्य असल्याचे विरोधक म्हणत होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवून काश्मीर भारताचा भाग बनवला. आता जम्मू काश्मीरचा वेगाने विकास होत आहे. अमित शाह यांच्या निर्णयामुळे काश्मीर शांत राहिले असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य पिछाडीवर होते. बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरु केले. जनतेसाठी नवीन योजना सुरु केल्या. जनतेला फक्त मोदी गॅरंटीवर विश्वास आहे. महाविकास आघाडीतील नेते महिलेला अपशब्द वापरतात अशा पक्षाच्या उमेदवारांना तुम्ही मत देणार का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. 

हिंदुत्वाचा गळा घोटणाऱ्यांना अमित शाह सोडणार नाहीत

अमित शाह बंद दरवाजाआड कोणताही शब्द देत नाहीत. त्यांचे बोलणे खुलेआम असते. परंतु सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ घेऊन हिंदुत्वाचा गळा घोटणाऱ्यांना गृहमंत्री अमित शाह सोडणार नाहीत, असा गर्भित इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

टॅग्स :amravati-pcअमरावतीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४