शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील नेत्यांनी अन्य राज्यात करून दाखविली कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 07:32 IST

Lok Sabha Election 2024 : अविनाश पांडेंची उत्तर प्रदेशात, तर तावडेंची बिहारमध्ये महत्त्वाची भूमिका

Lok Sabha Election 2024 : मुंबई : महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर अन्य राज्यांमध्ये सोपविलेल्या जबाबदारीला न्याय देत आपापल्या पक्षांना चांगले यश मिळवून दिले. त्यात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश पांडे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांनी महाराष्ट्राबाहेर करिष्मा करून दाखविला.

पांडे हे उत्तर प्रदेशचे प्रभारी आहेत. त्यांनी तिथे काँग्रेस-समाजवादी पार्टीमध्ये समन्वय राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेसचे पक्षसंघटन कमकुवत झालेले होते, त्याची पाचस्तरीय बांधणी सुरू केली. काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या १७ जागांवरील पक्षाचे जुने कार्यकर्ते, नेते यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना कामाला लावले. पांडे हे काँग्रेसच्या कार्यसमितीचे सदस्यदेखील आहेत. २०१४ च्या निवडणुकीतही ते उत्तर प्रदेशचे प्रभारी होते आणि तेव्हापासून ते राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असतात, त्याचा फायदा यावेळी झाला.

राहुल गांधी-प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभांना उत्तर प्रदेशात मोठी मागणी होती, त्याचे नियोजन पांडे यांनीच केले. आता २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षसंघटना मजबूत करण्याची मोहीम मी  १० जूनपासून सुरू करणार असल्याचे पांडे यांनी बुधवारी ‘लोकमत’ला सांगितले. २०१९ मध्ये उत्तर प्रदेशात केवळ १ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने यावेळी ६ जागा जिंकल्या. 

तिहेरी कामगिरी करण्यात मोठा वाटा तावडे हे बिहारमध्ये भाजपचे प्रभारी आहेत. नितीशकुमार यांना पुन्हा एनडीएसोबत आणण्यातही त्यांची भूमिका राहिलेली होती. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी तेथील जातीय समीकरणांची जुळवाजुळव करणे, लहान मित्रपक्षांना जोडणे आणि जागावाटप सुरळीत होईल याची काळजी करणे, अशी तिहेरी कामगिरी करण्यात तावडे यांचा मोठा वाटा राहिला. गेल्या वेळी ३८ जागा एनडीएने बिहारमध्ये जिंकल्या होत्या, त्या यावेळी २९ पर्यंत खाली आल्या. राजद-काँग्रेस-कम्युनिस्ट आदींनी तिथे भाजप-जदयू आणि मित्रपक्षांचे संख्याबळ कमी केले. जातीय समीकरणे काही ठिकाणी  विरोधात गेली; पण उत्तर प्रदेश, महाराष्ट्राइतकी झळ बिहारमध्ये बसली नाही.

यांनीही बजावली कामगिरीमाजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे केरळचे प्रभारी आहेत. केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच या निवडणुकीत कमळ फुलले, त्रिसूरमधून अभिनेते सुरेश गोपी हे भाजपचे उमेदवार विजयी झाले.भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर या राजस्थानच्या सहप्रभारीआहेत. तिथे गेल्या वेळपेक्षा भाजपच्या जागा १० ने कमी झाल्या. जातीय समीकरणे तसेच काँग्रेसने आरक्षण आणि संविधानबदलाबाबत केलेला प्रचार याचा फटका बसला. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक हे गुजरातचे काँग्रेस प्रभारी आहेत. तिथे गेल्या दोन निवडणुकांत शून्यावर असलेल्या काँग्रेसने एक जागा जिंकली.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल