शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांची उणीदुणी काढू नका, विधानसभेच्या तयारीला लागा, फडणवीसांनी कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 08:12 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: निवडणुकीत जय-पराजय होतच असतात, पण पराभवानंतर त्याचे खापर एकमेकांवर फोडायचे नसते. सगळ्यांनी जबाबदारीने आणि एकमेकांच्या सुरात बोलले पाहिजे, ही वेळ आता एकमेकांची उणीदुणी काढण्याची नाही. एकमेकांना सोबत घेऊन  पुढे जाणे महत्त्वाचे आहे

 मुंबई - निवडणुकीत जय-पराजय होतच असतात, पण पराभवानंतर त्याचे खापर एकमेकांवर फोडायचे नसते. सगळ्यांनी जबाबदारीने आणि एकमेकांच्या सुरात बोलले पाहिजे, ही वेळ आता एकमेकांची उणीदुणी काढण्याची नाही. एकमेकांना सोबत घेऊन  पुढे जाणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही बोलणे झाले आहे, अशा शब्दांत आमदार व पदाधिकाऱ्यांचे कान टोचतानाच महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचा झेंडा फडकत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि तुम्हीही थांबू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी शनिवारी दादर येथे भाजप विधिमंडळ गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपाचे मंत्री, नेते, आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. 

पंतप्रधान मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याप्रमाणेच तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होत आहेत.- याबाबत भाजप विधिमंडळ गटाकडून नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला.

चार पक्षांशी लढलोयंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही तीन पक्षांशी नव्हे तर चार पक्षांशी लढत होतो. तो चौथा पक्ष म्हणजे अपप्रचार होता. हा खोटा प्रचार आपल्या लक्षात आला नाही. त्यामुळे आपण त्याला रोखू शकलो नाही. भाजप संविधान बदलणार, महाराष्ट्रातले उद्योगधंदे इतर राज्यात पळवले गेले, भाजप मराठा आरक्षणाविरोधी आहे, असा खोटा प्रचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.दोन वेळा आपण मराठ्यांना आरक्षण दिले, मात्र ज्यांनी १९८० पासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याकडे मराठा समाजाची मते गेली. आपण मराठा विरोधी आहोत, असा खोटा प्रचार करण्यात विरोधक यशस्वी झाले.उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत खाली होता. यावर्षी अशी परिस्थिती अशी आहे की, गुजरात, कर्नाटक दिल्ली यांची एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे, असाही खुलासा त्यांनी केला. 

योग्य वेळी योग्य गोष्टी करूनिवडणुकीचा निकाल लागताच मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलोय. एक मिनिटही मी शांत बसणार नाही. आता मी काम करत आहे. करणार आहे, असं सांगतानाच 'योग्य वेळी योग्य गोष्टी करू', असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केले.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस