शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 07:18 IST

नागपूर आणि पूर्व विदर्भातील मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रवासाची सोमवारी महामुंबईतील १० आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांच्या मतदानाने सांगता होईल. सूर्याने डोळे वटारलेले असताना नेत्यांनी मात्र मैदान गाजविले.

मुंबई : लोकसभेची निवडणूक १६ मार्चला जाहीर झाली आणि महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्याच्या प्रचाराची सांगता शनिवारी झाली. प्रचाराच्या चौसष्टीत (६४ दिवसांमध्ये) अनेक दिग्गज नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भर उन्हात घाम गाळत प्रचाराचा धुराळा उडविला. आता जाहीर आरोप-प्रत्यारोपांना पूर्णविराम मिळाला असून २० मे रोजी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यानंतर प्रतीक्षा असेल ती ४ जूनच्या निकालाची.

नागपूर आणि पूर्व विदर्भातील मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रवासाची सोमवारी महामुंबईतील १० आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांच्या मतदानाने सांगता होईल. सूर्याने डोळे वटारलेले असताना नेत्यांनी मात्र मैदान गाजविले. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट लढतींचे चित्र बहुतेक मतदारसंघांमध्ये असले, तरी काही ठिकाणी तिहेरी लढतीही होत आहेत. केंद्र व राज्य सरकारचे विकासाचे दावे, त्यावर विरोधकांनी दिलेले प्रत्युत्तर, महागाई, बेरोजगारी, मुस्लिम आरक्षण, पंतप्रधानपदी कोण असावे, आदी मुद्यांभोवती प्रचार फिरला. उन्हाचा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसला. टक्केवारी अचानक कशी वाढली, यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर आरोप केले. अनेक मतदारांची नावे याद्यांमधून गायब असल्याचे आरोप झाले.

मोदींच्या झाल्या तब्बल १८ सभापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील एक रोड शोसह राज्यात १८ जाहीर सभा झाल्या. जवळपास अडीच लोकसभा तदारसंघामागे मोदींची एक सभा झाली.८ एप्रिलला त्यांची पहिली सभा झाली ती चंद्रपूरला आणि सांगता सभा १८ मे रोजी मुंबईत झाली.भाजप उमेदवारांबरोबरच मित्रपक्षांसाठीही त्यांनी सभांचा किल्ला लढविला. २०१९ मध्ये मोदींच्या १२ सभा राज्यातझाल्या होत्या.

देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या सर्वाधिक सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभांचे शतक पार केले.फडणवीस यांनी सर्वाधिक ११५, तर पटोले यांनी १०५ सभा घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ४८ सभा व ३७ रॅलीतून आक्रमक प्रचार केला.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ७, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १२ सभा घेत विरोधकांवर टीकास्र सोडले. महायुतीला पाठिंबा देणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ४ सभा घेतल्या.

शरद पवार, उद्धव ठाकरेंनीही लावला धडाका- शरद पवार, उद्धव ठाकरे या दिग्गज नेत्यांनीही सभांचा धडाका लावला. तब्येतीच्या मर्यादा झुगारत पवारांच्या साठहून अधिक सभा झाल्या.- उद्धव ठाकरेंनी तीसहून अधिक सभांमधून महायुतीला टीकेचे लक्ष्य केले. - काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या प्रत्येकी दोन सभांनी वातावरण ढवळून काढले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024PoliceपोलिसNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार