शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

"काहीही करा, पण नवनीत राणांना उमेदवारी नको"; अमरावतीतील भाजपा नेते फडणवीसांच्या बंगल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 19:24 IST

Devendra Fadnavis And Navneet Kaur Rana : अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. याच दरम्यान भाजपाच्या नेत्यांनी "काहीही करा, पण नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका" असं देवेंद्र फडणवीस यांना साकडं घातलं आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. काही मतदारसंघांमध्ये तिकिटाच्या आशेने नेत्यांचं पक्षांतर सुरू आहे. तर काही जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीत संघर्ष होताना दिसत आहे. यातच आता अमरावतीची जागा भाजपा लढवणार आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी "रामटेकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे राहील आणि अमरावतीची जागा भाजपा लढवणार" असं म्हटलं आहे. यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. याच दरम्यान आता अमरावतीतील भाजपाच्या नेत्यांनी "काहीही करा, पण नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका" असं देवेंद्र फडणवीस यांना साकडं घातलं आहे. 

अमरावतीमधील अख्खी भाजपा या क्षणी देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील बंगल्यावर दाखल झाली आहे. "काहीही करा, पण नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका" असं सर्व नेत्यांनी फडणवीस यांना साकडं घातलं आहे. प्रवीण पोटे, जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी, किरण महल्ले, निवेदिता चौधरी, चेतन पवार, किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर हे सर्वजण बंगल्यावर हजर असल्याची माहिती मिळत आहे. 

महायुतीचा घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी देखील आक्रमक भूमिका घेत आम्हाला विश्वासात घेतलं जात नसल्याचं सांगत भाजपाविरोधात रणशिंग फुंकलं आहे.  बच्चू कडू यांनी महायुतीला घरचा अहेर देत अमरावतीतून प्रहारचाही उमेदवार मैदानात उतरेल, अशी घोषणा केली आहे. 

"मतदारसंघात आमची ताकद असतानाही आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. उलट महायुतीच्या संभाव्य उमेदवाराकडून आमच्याच कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जातात. त्यामुळे आम्ही या जागेवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला एक चांगला उमदेवार मिळाला असून ६ एप्रिल रोजी आम्ही या उमेदवाराची घोषणा करू. हा उमेदवार भाजपमधीलच आहे" असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBJPभाजपाAmravatiअमरावती