शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गावातील पाणी टंचाईमुळे महिलांनी शिवसेना आमदारच भाषण थांबवल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 15:43 IST

शिवसेना आमदार संदीपान भुमरे, भाजप जिल्हाउपाध्यक्ष सुनील शिंदे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यासाठी गेले होते. यावेळी आमदार यांचे भाषण सुरू असतानाच गावातील महिलांनी हातात हंडे घेत बैठकीत दाखल झाल्या. आमच्या गावात पाणी टंचाई आहे,जनावरांना चार नाही. आधी आमच्या समस्या सोडवा नंतर तुमचे भाषण ठोका अशा प्रकारे पवित्रा घेत भाषण बंद पाडले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आलेल्या शिवसेना आमदाराला महिलांनी घेराव घालत गावातील पाणी टंचाई बद्दल जाब विचारला. गावात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, त्यावर आधी बोला असे म्हणत महिलांनी आमदारच भाषण बंद पाडले. महिलांची आक्रमकता पाहून आमदार आणि प्रचाराला गेलेल्या कार्यकर्त्यांनी आपले भाषण आवरते घेऊन काढतापाय घेतला.जालना लोकसभा मतदारसंघात पैठण तालुक्यातील अनके गावात सोमवारी भाजपचे उमदेवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ गाव भेटी घेऊन बैठक घेण्यात आल्या. लिंबेगाव येथे शिवसेना आमदार संदीपान भुमरे, भाजप जिल्हाउपाध्यक्ष सुनील शिंदे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यासाठी गेले होते. यावेळी आमदार यांचे भाषण सुरू असतानाच गावातील महिलांनी हातात हंडे घेत बैठकीत दाखल झाल्या. आमच्या गावात पाणी टंचाई आहे,जनावरांना चार नाही. आधी आमच्या समस्या सोडवा नंतर तुमचे भाषण ठोका अशा प्रकारे पवित्रा घेत भाषण बंद पाडले.

महिलांनी घेतलेल्या भुमिकेमुळे आमदार भुमरे आणि शिवसेना-भाजप नेते यांनी महिलांना बैठक झाल्यावर आपण चर्चा करू असे आवाहन केले. मात्र गावकरी महिला यांचा रोष वाढत असल्याचे लक्षात घेत आमदार भुमरे यांनी आपले भाषण आवरते घेत, गावात अजून एक टॅंकरची व्यवस्था करतो असे सांगत गावातून काढतापाय घेतला.

जालना लोकसभा मतदारसंघातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे याच मतदारसंघातील ११ गावांनी मतदानावर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सरकार बद्दल प्रचंड रोष पाहायला मिळत असून हा रोष मतपेटीत पाहायला मिळाला तर भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या अडचणी वाढू शकतात.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdroughtदुष्काळWaterपाणीFarmerशेतकरीShiv Senaशिवसेना