शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रणसंग्राम २०१९ : लक्ष्यस्थानी होतं भाजप अन् 'टार्गेट' झाली शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 16:10 IST

भय पक्षांतील वाद विकोपाला गेल्यानंतर देखील युती झाल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. तर अनेकांच्या मते अंतर्गत सर्व्हेमुळेच युती निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. चर्चा काहीही असली तरी भाजप आणि शिवसेना एकोप्याने लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले.

मुंबई - महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान झाले असून २९ एप्रिल रोजी राज्यातील मतदानाचा अखेरचा टप्पा समाप्त होणार आहे. मतदान झालेल्या ३१ जागांचे रिपोर्ट येण्यास सुरुवात झाली असून ही लोकसभा निवडणूक शिवसेनेला २०१४ च्या तुलनेत खडतर ठरणार असल्याचे समजते.

काही महिन्यांपूर्वी भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत युती नाहीच, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. अनेकदा सत्तेला लाथ मारण्याची भाषाही केली होती. परंतु, केंद्रीय नेतृत्वासोबतच्या बैठकीनंतर शिवसेना-भाजपचा मिलाप झाला. उभय पक्षांतील वाद विकोपाला गेल्यानंतर देखील युती झाल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. तर अनेकांच्या मते अंतर्गत सर्व्हेमुळेच युती निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. चर्चा काहीही असली तरी भाजप आणि शिवसेना एकोप्याने लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले.

लोकसभा प्रचारात देखील आघाडी आणि भाजप यांच्यातच खरी लढत पाहायला मिळाली. यामध्ये शिवसेना फारशी रणांगणावर दिसून आली नाही. आघाडीकडून सर्वाधिक लक्ष्य भाजपला करण्यात आले. तर आघाडीच्या नेत्यांकडून सर्वाधिक टीका भाजपवर करण्यात आली. भाजपने या निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा चांगलाच रेटला. मात्र शिवसेनेचे प्रचारातील मुद्दे अखेरपर्यंत समोर आलेच नाही. अखेरच्या टप्प्यात शिवसेनेकडून वि.दा. सावरकर यांच्याविषयी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. हा मुद्दा वगळल्यास लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा स्टॅन्ड फारसा लक्षवेधी ठरला नाही, हे वास्तव आहे.

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी भाजप-शिवसेना युती फिसकटली होती. त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्याकडून एकमेकांवर झालेली टीका संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली होती. तर प्रमुख विरोधक असलेली आघाडी कुठेही दिसत नव्हती. सगळीकडे शिवसेना आणि भाजपचीच चर्चा होती. शिवसेना आणि भाजपला याची मदतच झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या लक्ष्यस्थानी जरी भाजप असले तरी टार्गेट शिवसेनाच झाल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांनी देखील शिवसेनेवरील टीका टाळली असून लोकसभा निवडणुकीत उल्लेख न झाल्याने शिवसेनेच्या समस्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाShiv Pratap Shuklaशिव प्रताप शूक्ला