शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंचं मराठा कार्ड; प्रितम मुंडेंसाठी संभाजी राजे बीडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 17:38 IST

मृत्यूपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी गरज पडल्यास आपल्या मुलींच्या पाठिशी उभं राहण्याची गळ आपल्याला घातली होती. त्यामुळे मी प्रितम मुंडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देण्यासाठी परळीत आल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले.

मुंबई - राजकारण आणि जातीची समीकरणे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे बीड जिल्ह्यातील राजकारणा आजपर्यंत पुढे चालत आले आहे. बीडमधील प्रत्येक निवडणूक जातीच्या गणितांवर अवलंबून असते. यातून लोकसभा निवडणूकही सुटली नाही. बीडमध्ये पुन्हा एकदा मराठा-वंजारी वाद होण्याची चिन्हे असून प्रमुख उमेदवार जातीची समीकरणे जुळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीला शह देण्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांना प्रचारासाठी बोलविले आहे. यामुळे पंकजा यांनी मराठा मतांसाठी प्रचारात संभाजी राजेच्या रुपाने मराठा कार्ड वापरल्याची चर्चा सध्या बीडमध्ये रंगत आहे. मुंडे कुटुंबियांचे आणि आमचे अनेक दिवसांचे संबंध आहेत. माझ्या शिव-शाहू दौऱ्याच्या वेळी गोपीनाथ मुंड यांनी आपल्याला भगवान गडावर बोलवले होते. तसेच मृत्यूपूर्वी त्यांनी गरज पडल्यास आपल्या मुलींच्या पाठिशी उभं राहण्याची गळ घातली होती. त्यामुळे मी प्रितम मुंडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देण्यासाठी परळीत आल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले. बीडमध्ये मराठा नेते विनायक मेटे यांनी आधीच पंकजा मुंडे आणि भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. राज्यात भाजपसोबत पण बीडमध्ये राष्ट्रवादीला मदत करणार, असं स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठा मते भाजपविरोधी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे रोखण्यासाठीच पंकजा यांनी संभाजी राजेंना बीडमध्ये आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संभाजी राजे यांना बोलवून पंकजा यांनी मराठा समाजाला साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. आता राष्ट्रवादीकडून यावर काय प्रत्युत्तर येणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.भाजपच्या वतीने संभाजी राजे यांना राज्यसभेवर घेतले आहे. मी राष्ट्रपती स्विकृत खासदार असलो तरी भाजपच्या मदतीमुळे राज्यसभेवर आहे. त्यामुळे सहाजिकच मोदी पुन्हा सत्तेवर यावे असं आपल्या वाटत असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPritam Mundeप्रीतम मुंडेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीBJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडे