शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : औरंगाबादच्या बदल्यात काँग्रेसला हवय उस्मानाबाद ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 17:04 IST

लातूर आणि सोलापूर मतदार संघातील लिंगायत समाजाचा वाढता प्रभाव पाहता चाकूरकर यांना उस्मानाबादेतून लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यास काँग्रेस इच्छूक आहे.

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अनेक पक्षांना उमेदावारी जाहीर केली आहे. परंतु, तिढा निर्माण झालेल्या जागांचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. यामध्ये मराठवाड्यातील काही मतदार संघांचा समावेश आहे. हिंगोली मतदार संघासह आता औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा तिढा समोर आला आहे. राष्ट्रवादीला औरंगाबाद मतदारसंघ हवा असून काँग्रेसलाउस्मानाबाद मतदार संघ हवाय. याआधी हिंगोली मतदार संघासाठी शिवसेना-भाजप यांच्यात तिढा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. परंतु काही जागा लढवण्यावरून तिढा निर्माण झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद आणि उस्मानाबाद मतदार संघांचा समावेश आहे. लातूर मतदार संघ राखीव असल्यामुळे शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासाठी काँग्रेसने उस्मानाबाद मतदार संघाची मागणी केली आहे. लातूर आणि सोलापूर मतदार संघातील लिंगायत समाजाचा वाढता प्रभाव पाहता चाकूरकर यांना उस्मानाबादेतून लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यास काँग्रेस इच्छूक आहे. त्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीला देखील औरंगाबाद मतदार संघ हवा आहे. त्यामुळे औरंगाबादच्या मोबदल्यात राष्ट्रवादी उस्मानाबाद मतदार संघ काँग्रेसला देईल का, असा प्रश्न आहे. सध्या तरी उस्मानाबादमधून राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्या पद्मसिंह पाटील यांच्या सून आहेत. त्याचवेळी त्यांचे पती राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव देखील चर्चेत आहे. परंतु, उस्मानाबाद मतदार संघ काँग्रेसला दिल्यास पद्मसिंह पाटील यावर काय भूमिका हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादOsmanabadउस्मानाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकर