शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

१ सप्टेंबरनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम राहणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सूतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 08:38 IST

सुरू केलेल्या गोष्टी पुन्हा बंद होऊ देऊ नका, १ सप्टेंबरपासून शाळा उघडण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत असले तरी राज्यातील शाळा इतक्यात उघडण्याची शक्यता नाही.

मुंबई/ठाणे : जूनपासून देशात ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू झाले. देशातील काही राज्यांनी पटापट निर्णय घेऊन व्यवहार सुरळीत सुरू केले असले तरी महाराष्ट्र सरकार तशी घाई करणार नाही. त्यामुळे १ सप्टेंबरनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम राहील, असे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ठाण्यात कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ठाकरे सोमवारी आले होते. महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या समवेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, जगभरातील काही देशांनीही काही गोष्टी घाईगडबडीने सुुरू केल्या. मात्र महाराष्ट्र अशी घाईगर्दी करणार नाही. कारण आपण ज्या गोष्टी सुरू केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन सुरू केल्या आहेत. पण, ज्या गोष्टी सध्या उघडणे शक्य नाही, किंवा त्या उघडल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव किती वाढेल, याची खात्री नाही त्या सुरू केल्या नसल्याचे ठाकरे म्हणाले.ठाणेकरांनी सर्व नियम पाळून गणपती उत्सव साजरा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. गणेशोत्सवाआधी एक प्रश्न नेहमी विचारला जायचा की, उत्सव कसा साजरा होणार, विसर्जन कसे होणार, परंतु सर्वधर्मीयांनी सामाजिक जाणिवेतून उत्सव साजरे केले. त्यासाठी सर्वांना धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळवा आणि मुंब्य्रात ११०० बेडच्या कोविड केअर सेंटरचे ई-लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे कळवा आणि मुंब्य्रातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबई आणि एमएमआरडीए क्षेत्रात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत होती. परंतु मागील महिनाभरात सर्वांनी अत्यंत खंबीरपणाने या साथीचा मुकाबला केल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. कोरोना रोखण्यात यश आल्यामुळे कौतुकाची थाप मिळाल्याने गाफील न राहता आपल्याला रुग्णसंख्या शून्यापर्यंत खाली आणायची आहे हे विसरू नका, असे ठाकरे यांनी महापालिकांच्या प्रशासनास बजावले.शाळा-महाविद्यालये कधी उघडणार?१ सप्टेंबरपासून शाळा उघडण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत असले तरी राज्यातील शाळा इतक्यात उघडण्याची शक्यता नाही. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. शिवाय, शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे करण्यात यावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारपुढे ठेवला आहे. ११ वी प्रवेशासाठी सगळीकडे झुंबड उडालेली असली तरी नवीन शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार याबाबत संभ्रम कायम आहे.ई-पासबाबत मंत्रिमंडळात निर्णयआंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीसाठी ई-पासचे बंधन हटविण्यात यावे, अशी सूचना केंद्र सरकारने केली असली तरी महाराष्ट्र सरकारने ती अद्याप अंमलात आणलेली नाही. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.केडीएमसीत रुग्णसंख्या घटेलकल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना हाती घेतल्याने पुढील २० ते २५ दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने घटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रेस्टॉरंट, चित्रपटगृहे बंदच राहाणारसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याची कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, राज्यातील रेस्टॉरंट, चित्रपटगृहे उघडली जाण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, जिमबाबत येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय होऊ शकतो.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार