शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

Lockdown in Maharashtra : "राज्यातील सरसकट लॉकडाऊन हटवला जाणार नाही, पण...."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 19:01 IST

Lockdown in Maharashtra : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देराज्यात सरसकट लॉकडाऊन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याचे राजेश टोपे म्हणाले.

मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील लॉकडाऊन सरसकट हटवला जाणार नाही, पण निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. (lockdown extend in-maharashtra in some places, rules will be relaxed says rajesh tope)

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची मुदत संपत आली असून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली असून येत्या दोन दिवसांमध्ये लॉकडाऊनसंदर्भातली नियमावली जाहीर केली जाईल. मुख्यमंत्र्यांसोबत सर्वच मंत्र्यांचे मत लॉकडाऊन लगेच काढणे शक्य  होऊ शकणार नाही, यावर एकमत झाल्याचे देखील राजेश टोपे यांनी सांगितले. 

("मराठा आरक्षणाबाबत भाजपाचा कळवळा फक्त दिखाऊ", अशोक चव्हाणांची टीका)

याचबरोबर, राज्यात सरसकट लॉकडाऊन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याचे राजेश टोपे म्हणाले. तसेच, सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता आणण्याचा विचार झाला आहे. या संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्बंधांच्या शिथीलतेबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तौक्ते वादळासह पदोन्नती आरक्षणावरही चर्चा झाली. मात्र, या आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले. 

'लसींबात धोरण निश्चित करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती करणार' ग्लोबल टेंडरमध्ये मॉडर्ना, फायझर, स्पुतनिक, एस्ट्राझेनेका, जॉन्सन एन्ड जॉन्सन्स या कंपन्यांकडून प्रतिसाद आला आहे. काही कंपन्यांनी किंमत दिली आहे. तर काही कंपन्यांनी किमतीबाबत माहिती दिली नाही. दरम्यान, केंद्राकडून सध्या कोविशील्ड, कोव्हॅक्सीन आणि स्पुटनिक या लसींनाच परवानगी देण्यात आलेली आहे. इतर लसींनाही परवानगी देण्याबाबतचा विषय केंद्राचा आहे. त्यामुळे लसींच्या आयातीबाबत राष्ट्रीय पातळीवर एक धोरण निश्चित करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

("भाजपानेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली?")

दरम्यान, राज्यातील लॉकडाऊन आता १ जूननंतरही कायम राहणार आहे. मात्र, काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्या राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, काही जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट जास्त असल्याने सरकार अजूनही सावध भूमिकेत आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठवला जाणार की, कायम ठेवला जाणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस