शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लॉकडाऊनमुळे ४३ टक्के सामान्य नैराश्याच्या गर्तेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 06:20 IST

अभ्यासातील निष्कर्ष : निरुत्साह, सतत कंटाळा, झोपेच्या समस्यांनी अनेक जण झाले त्रस्त

स्नेहा मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मागील पाच महिन्यांमध्ये ४३ टक्के सामान्य नैराश्याच्या गर्तेत अडकल्याचे धक्कादायक वास्तव एका अभ्यासातून समोर आले आहे. मानसिक आरोग्याविषयी केलेल्या या अभ्यासानुसार, २६ टक्के सामान्य लोकांना नैराश्याची (डिप्रेशन) सौम्य लक्षणे असल्याचे समोर आले, तर ११ टक्के लोकांनी काही प्रमाणात नैराश्य आल्याचे म्हटले आहे. याशिवाय सहा टक्के लोकांमध्ये नैराश्याची तीव्र लक्षणे दिसून येत आहेत. मानसिक आरोग्याविषयीचा हा अभ्यास ‘गोकी’ या स्मार्ट हेल्थ इकोसिस्टिमचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने केला आहे.

सध्याचा लॉकडाऊनचा काळ सामान्य लोकांसाठी मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही कठीण जात आहे. कोरोनाची भीती, लॉकडाऊन, रोजगार नसल्याची किंवा थांबल्याची चिंता, आरोग्यविषयक समस्या, आजूबाजूचे वातावरण, सेप्रेशन अ‍ॅन्झायटी अशा अनेक समस्यांमुळे मानसिक ताण वाढताना दिसत आहे. मानसिक ताण हा नैराश्यावस्थेत रूपांतर घेत असतो, असे या अभ्यासात म्हटले आहे.अहवालानुसार, ५७ टक्के व्यक्तींना दररोज निरुत्साही वाटणे, सतत कंटाळा येणे, झोपेची समस्या उद्भवणे किंवा जास्त वेळ झोपणे अशा तक्रारी उद्भवत आहेत.

लॉकडाऊनमुळे बहुतांश व्यक्तींचे झोपेचे वेळापत्रक बिघडल्याचे समोर आले आहे. या अभ्यासानुसार, मानसिक स्वास्थ्याचे संतुलन राखण्यासाठी ध्यानधारणा, योग वा व्यायाम करणे गरजेचे आहे. पाच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सामाजिक, आर्थिक बदल होत आहेत. या परिस्थितीला सामोरे कसे जायचे, हा प्रश्न पडतो. हाच भावनिक आवेग इतका जोरदार असतो की त्यातून या काळात मानसिक आधाराची गरज वाटते. अशा वेळी मनातील भावना, ताण व्यक्त करायला हवा. ही परिस्थिती स्वीकारून भावनिक, मानसिक सहनशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या परिस्थितीशी दोन हात करताना सकारात्मक बाजू तपासून घ्यायला हव्यात, असे मानसोपचातज्ज्ञ डॉ. नितीन जैन यांनी सांगितले.उपाय आहे, घाबरू नका!एखाद्या भळभळत्या जखमेएवढीच तीव्र यातना देणारा, पण कुणाला न दिसणारा हा आजार आहे. दु:ख विसरावे, सहन करावे असा त्रासदायी गैरसमज आहे. नैराश्यासाठी विशिष्ट औषधे असून ती परिणामकारक आणि सुरक्षित आहेत. नैराश्यात समुपदेशनाचा विशेष उपयोग होतो. पण समुपदेशकांशी नुसत्या गप्पा मारून निराशा कमी होते हा खूप मोठा गैरसमज आहे. समुपदेशन म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच असते, त्यात रुग्णाला मेहनत घ्यावी लागते. नैराश्याचे प्रमाण कमी असेल, योग्य प्रशिक्षित समुपदेशक असेल आणि सांगितलेले बदल करण्याची रुग्णात क्षमता असेल तर समुपदेशनाचा चांगला उपयोग होतो. समुपदेशन डोळसपणे घ्यावे. अन्यथा त्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात. औषध आणि समुपदेशन, दोन्ही एकत्र घेणे योग्य आहे.- डॉ. नवीन शाह, मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस