शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

लोकल दहीहंडी ग्लोबल होईल

By admin | Published: August 30, 2015 12:22 AM

गोकुळाष्टमी म्हणजेच दहीहंडी हा उत्सव महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा एक महत्त्वाचा सण. आजवर आपण गोकुळाष्टमीला फुटणारी दहीहंडी पाहात आलो आहोत.

 विनोद तावडे ( क्रीडा मंत्री)

गोकुळाष्टमी म्हणजेच दहीहंडी हा उत्सव महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा एक महत्त्वाचा सण. आजवर आपण गोकुळाष्टमीला फुटणारी दहीहंडी पाहात आलो आहोत. अगदी लाखो लोक दहीहंडी पाहण्यासाठी गर्दी करीत असतात. आजवर लोकल असलेला मानवी मनोरे रचण्याचा हा थरारक खेळ ग्लोबल करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत राज्य सरकारने या दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्राची सीमा ओलांडून तो आता देशभरात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याचा हा मार्ग आहे. हा दर्जा देताना हा खेळ कसा अधिकाधिक सुरक्षित राहील याचीही दक्षता घेतली जात आहे. दहीहंडी फोडण्यासाठी रचण्यात येणारे मानवी मनोरे हे चित्तथरारक असतात. आजवर आपण केवळ उत्सव या दृष्टिकोनातूनच याकडे पाहात आलो आहोत. या मानवी मनोऱ्यांच्या माध्यमातून कळत-नकळत संघभावना, साहस, जिद्द, चिकाटी या भावना आणि शारीरिक क्षमता वाढीस लागते. हा क्रीडा प्रकार असून, तो एक दिवसाच्या उत्सवापुरता मर्यादित न राहता १२ महिने कधीही खेळता येईल, या दृष्टीने साहसी खेळाचा दर्जा देऊन त्याचा समावेश साहसी क्रीडा प्रकारांत करण्याबाबत सरकारकडे वेळावेळी विविध स्तरांवरून मागणी करण्यात येत होती. त्यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीने सरकारला शिफारशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यास मान्यता येण्यात आली होती. त्याचप्रमाणे गोविंदा या मानवी मनोरे उभारण्याच्या प्रकाराला साहसी खेळाचा दर्जा देण्याची मान्यता देण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. या पार्श्वभूमीवर गोविंदाला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. दहीहंडी उत्सवाला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देताना या खेळासाठी आवश्यक नियमावली आखण्यात येईल. यासाठी या क्रीडा प्रकाराला शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येईल, तसेच यासाठी सुरक्षा साधनांचा योग्य वापर करण्यासंदर्भात, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर दहीहंडीचा सहभाग करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. मुळात राज्याच्या व्यापक क्रीडा धोरणांतर्गत राज्यात साहसी क्रीडा प्रकारांना उत्तेजन देण्याच्या मुद्द्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र स्टेट अ‍ॅडव्हेंचर स्पोटर््स सेंटरची स्थापना करणे, साहसी खेळांच्या क्रीडा सुविधांची निर्मिती करणे, साहसी खेळांच्या स्पर्धा, प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे आयोजन, साहसी क्रीडा पुरस्कार देणे, साहसी खेळांच्या राज्य संघटना, संस्था व खेळाडूंना आर्थिक साहाय्य देणे आदी विविध बाबींचा अंतर्भाव आहे. साहसी क्रीडा प्रकारांतील ट्रेकिंग, माउंटनिअरिंग, स्किइग, स्नोबोर्डिंग, पॅरासेलिंग, हॅण्डग्लायडिंग, पॅराग्लायडिंग, जलक्रीडा आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी सुधारित नियम व मार्गदर्शक सूचना देण्यासाठी पुणे येथील क्रीडा व युवक सेवा आयुक्तांच्या अध्यक्षतेसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. अशाप्रकारे राज्यात साहसी क्रीडा प्रकारांना उत्तेजन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.