शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

भारनियमन अटळ! अदानी कंपनीने वीजपुरवठा बंद केल्याचा ऊर्जा मंत्र्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 13:10 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कोळशाची उपलब्धता, वीज भारनियमन, ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे वीज पुरवठ्याचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली.

मुंबई : वीज टंचाईमुळे राज्यात १,४०० ते १,५०० मेगावॅट विजेचे भारनियमन करावे लागणार असून, नागरिकांनी ते सहन करावे, असे आवाहन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. अदानी वीज कंपनीने महावितरणचा वीजपुरवठा बंद केल्याने राज्यावर वीज भारनियमनाचे संकट ओढवले आहे, असा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कोळशाची उपलब्धता, वीज भारनियमन, ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे वीज पुरवठ्याचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर नितीन राऊत म्हणाले, अदानी पॉवर कंपनीने तिरोडा येथील  प्रकल्पातून पुरवठा अचानक कमी केला. ३,१०० मेगावॅटचा करार आहे. पण, पुरवठा १,७६५ मेगावॅट केला. त्यांच्याकडून १४०० मेगावॅट वीज कमी मिळाली. त्यांनी हा निर्णय अचानक घेतला. 

वीज खरेदी कराराचा भंग केल्यामुळे अदानी कंपनीला नोटीस पाठवण्यात येईल. जेएसडब्ल्यूकडून १०० मेगावॅट वीज मिळायची. परंतु त्यांचा प्रकल्प बंद झाल्याने तीही वीज मिळत नाही. सीजीपीएलसोबत जो करार होता, त्यानुसार ही मागणी केली होती, ७६० मेगावॅट वीज मागितली आहे. त्यांनी ६३० मेगावॅट वीज दिली. वीज व कोळसा मिळत नसल्यामुळे आम्हाला भारनियमन करावे लागत आहे. महावितरणला १,५०० मेगावॅट वीज मिळाली तर भारनियमन होणार नाही, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन- वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. या परिस्थितीत सर्वांनीच वीज बचत करायला हवी. विजेची उधळपट्टी थांबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिले. - आवश्यक वीज उपलब्ध व्हावी, यासाठी खासगी वीज कंपन्या तसेच अन्य पर्यायी मार्गांबाबतचे नियोजन करावे. त्यासाठीच्या लागणाऱ्या परवानग्यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

... तर भारनियमन नाहीवीज व कोळसा मिळत नसल्यामुळे आम्हाला भारनियमन करावे लागत आहे. महावितरणला १५०० मेगावॅट वीज मिळाली तर भारनियमन होणार नाही.- नितीन राऊत, ऊर्जा मंत्री

- आपण आयात कोळशासाठी कंपन्यांना विनंती केली आहे. मात्र, त्यांना वेळ लागणार आहे. आम्ही आठ हजार मेगावॅट क्षमतेने प्रकल्प सुरु करण्याच्या प्रयत्नात आहोत. - त्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. वसुली, वितरण हानी आणि वीजचोरी असलेल्या भागात भारनियमन सुरु करण्यात आल्याचेही राऊत म्हणाले.- केंद्राचे कोळशाचे नियोजन फसले आहे. शिवाय कोळसा मंत्रालयाला रेल्वे मंत्रालयाचे सहकार्य नाही. - त्यामुळे भाजपने खुशाल केंद्र सरकारविरोधात आंदोलन करावे, असा टोला राऊत यांनी लगावला. राज्यात फडणवीस सरकार असतानादेखील भारनियमन होते, असा आरोपही राऊत यांनी यावेळी केला.

२१ एप्रिलची उपलब्धता -- विजेची स्थिती - २४००० मेगावॅट मागणी- २२००० - मेगावॅट निर्मिती- २००० मेगावॅट तूट 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेelectricityवीजmahavitaranमहावितरणNitin Rautनितीन राऊत