LMOTY 2024: चंद्रपूरला 'सक्षम' करणाऱ्या IAS विवेक जॉन्सन यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर' पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 18:59 IST2024-02-15T18:58:12+5:302024-02-15T18:59:51+5:30
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या भव्य दिव्य सोहळ्यात झाले पुरस्कारांचे वितरण

LMOTY 2024: चंद्रपूरला 'सक्षम' करणाऱ्या IAS विवेक जॉन्सन यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर' पुरस्कार प्रदान
Vivek Johnson, Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: प्रशासन, वैद्यकीय, क्रीडा, कृषी, राजकारण, उद्योग, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. आज मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या भव्य दिव्य अशा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२४'च्या सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्याला सक्षम करण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्या विवेक जॉन्सन यांना 'IAS प्रॉमिसिंग' विभागात मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रात विकासाकरिता विवेक जॉन्सन यांनी १० प्रकल्प राबविले. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी 'मिशन सक्षम' हा उपक्रम राबविला. चंद्रपूर जिल्ह्यातील विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी (CWSN) एक परिवर्तनकारी उपक्रम ठरला आहे, ज्यामुळे अशा मुलाच्या शैक्षणिक संधी, एकूण कल्याण आणि भविष्यातील संधीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली प्रभावाची एक झलक आहे. खेळाडूसाठी क्रीडा संकुल व विद्यार्थ्यांसाठी सायन्स पार्क उभारले. 'खेलो चंदा या उपक्रमात 85 MGNREGS-समर्थित क्रीडा संकुलासह ग्रामीण शाळामध्ये बाधण्यात आला आहे, चंदपूर जिल्ह्यासाठी हा उपक्रम एक गेम चेंजर ठरला आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ओपन सायन्स पार्क हा उपक्रम विज्ञानाची आवड निर्माण करत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना गौरविण्यात आले.
यंदाच्या विजेत्यांची निवड करण्यासाठी परीक्षक मंडळ तयार करण्यात आले होते. या 'सुपर ज्युरी'मध्ये डॉ. विजय दर्डा, सुधीर मुनगंटीवार, धनंजय मुंडे, देवेन भारती, सोनू निगम, रमेश दमाणी, नमिता थापर, महेश काळे, डॉ. विजय भटकर, डॉ. अमित मायदेव, पोपटराव पवार, राजीव पोद्दार आणि ऋषी दर्डा यांचा समावेश होता.