शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन धोक्यात; निविदेत अडकली लस : सरकार हतबल

By अतुल कुलकर्णी | Updated: January 24, 2018 03:41 IST

मुक्या जनावरांना लाळ्या खुरकत (एफएमडी) रोग होऊ नये, म्हणून दिल्या जाणाºया लसीच्या खरेदीत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी घोळ घातल्यामुळे राज्यातील पशुधन धोक्यात आले. तर गोवंश हत्याबंदीचा कायदा करणारे भाजपा सरकार गायींना साथीच्या आजारात सोडून मोकळे झाले आहे.

अतुल कुलकर्णी मुंबई : मुक्या जनावरांना लाळ्या खुरकत (एफएमडी) रोग होऊ नये, म्हणून दिल्या जाणाºया लसीच्या खरेदीत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी घोळ घातल्यामुळे राज्यातील पशुधन धोक्यात आले. तर गोवंश हत्याबंदीचा कायदा करणारे भाजपा सरकार गायींना साथीच्या आजारात सोडून मोकळे झाले आहे.जनावरांसाठीच्या एफएमडी लसीच्या पुरवठ्यासाठी हवी ती कंपनी पात्र ठरत नसल्यामुळे, ९ महिन्यांत तब्बल ५ वेळा निविदा काढण्यात आल्या आहेत. या कालापव्ययात लसीअभावी पशुधन धोक्यात आले आहे. हे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर सरकारला जाग आली.जनावरांना लाळ्या खुरकत रोग होऊ नये, म्हणून ‘एफएमडी’ लस दिली जाते. अशी लस बनविणाºया देशात फक्त तीनच कंपन्या आहेत. त्यामुळे कितीदाही टेंडर काढले, तरी पुन्हा याच कंपन्या स्पर्धेत येणार. दरही तेच असणार. हे माहिती असूनही टेंडरचा घोळ घातला जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. लस बनविणाºया ३ कंपन्यांपैकी इम्युनॉलॉजिकल्स ही कंपनी राष्टÑीय दुग्धविकास मंडळाची अंगीकृत संस्था आहे. त्यामुळे या कंपनीचे दर जगजाहीर असतात. ते पाहूनच खासगी कंपन्या कमी दराचे टेंडर भरत आहेत. शिवाय, खासगी कंपनी पडद्याआड जे देऊ शकेल, ते केंद्र शासनाची अंगीकृत कंपनी देणार नाही, हे गृहीत धरून हा सगळा घोळ घालण्यात येत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. ज्या ‘इंडियन’ कंपनीला जानकरांचा विरोध आहे, त्या कंपनीची लस अनेक राज्यांत कोणतीही निविदा प्रक्रिया न करता मागविली जाते. एवढी या कंपनीची विश्वासार्हता आहे, तर मंत्री जानकरांनी आग्रह धरलेल्या कंपनीच्या लसीचा दर्जा योग्य नसल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.