धरणातील झाडावर अडकून पडलेल्या ८ माकडांना जीवदान

By Admin | Updated: July 30, 2016 22:46 IST2016-07-30T22:46:02+5:302016-07-30T22:46:02+5:30

धरणात असलेल्या एका झाडावर आठ माकडे अडकून पडली

Lives 8 Monkeys stuck on the dam tree | धरणातील झाडावर अडकून पडलेल्या ८ माकडांना जीवदान

धरणातील झाडावर अडकून पडलेल्या ८ माकडांना जीवदान

ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड, दि. 30 - मागील तीन ते चार दिवसांपासून तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे ग्राम बेंबळा परिसरातील बोरगाव धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे या धरणात असलेल्या एका झाडावर आठ माकडे अडकून पडली होती. या सर्व माकडांना वन विभाग व सर्वधर्म आपत्कालीन संस्थेच्या पथकाने मोठ्या शिताफीने बाहेर काढून जीवदान दिले.
मागील आठवड्याहून अधिक काळापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. जंगली प्राणी रात्रीच्या वेळेस झाडावर आसरा घेत असतांत. अशातच गेल्या तिन चार दिवसामध्ये रात्रीच्या दरम्यान दमदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे परीसरातील जलसाठयामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली. कामरगाव परीसरातील बोरगाव धरण मोठया प्रमाणात भरले. धरणाच्या काठावर असलेल्या झाडावर आश्रय घेणारे ८ माकडे अडकली होती.
पाण्यापासून आपला जिव वाचावा याकरीता ति माकडे दोन दिवसापासून कासाविस झाले होते. परीसरातली शेतक-यांना ८ माकडे झाडावर आश्रय घेऊन असल्याची माहिती परीसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाला देउन वन विभागाचे वन अधिकारी डोंंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वधर्म आपतकालीनचे शाम सवाई यांनी शोधमोहीम पथकातील सदस्यांला तसचे डोगा घेऊन रवाना झाले. यावेळी वाघोला येथील डोगा चालक रामदास पारधी यांच्या अथक परीश्रमाने या आठही माकडांना जीवदान मिळाले. त्यामुळे या टिमचे उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे व तहसिलदार सचिन पाटील यांनी कौतूक केले.

Web Title: Lives 8 Monkeys stuck on the dam tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.