धरणात अडकलेल्या बिट्याला जीवदान

By Admin | Updated: August 19, 2016 23:00 IST2016-08-19T23:00:32+5:302016-08-19T23:00:32+5:30

वडज धरण परिसरातील इनामवाडीवस्तीवर आजारी अवस्थेत वावरत असलेली बिबट्याच्या मादीला माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्र व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिले

Lived in the dam | धरणात अडकलेल्या बिट्याला जीवदान

धरणात अडकलेल्या बिट्याला जीवदान

जुन्नर तालुक्यातील इनामवाडी परिसरात वडज धरणाच्या पाण्यातून बिबट्याच्या मादीला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिले जीवदान
आजारी बिबट्याची मादी पळताना धरणाच्या पाण्यात गेली होती
जुन्नर : वडज धरण परिसरातील इनामवाडीवस्तीवर आजारी अवस्थेत वावरत असलेली बिबट्याच्या मादीला माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्र व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिले. याबाबत घडलेली घटना अशी, इनामवाडीवस्तीवर गुरुवारी संध्याकाळी बिबट्याचा वावर ग्रामस्थांच्या निदर्शनास आला होता. शुक्रवारी सकाळी ७ वाजता पुन्हा बिबट्या निदर्शनास आला. त्यानंतर वनविभागास याची माहिती मिळाल्यावर माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्राचे अजय देशमुख, सहकारी महेंद्र ढोरे, वनविभागाचे कर्मचारी इनामवाडीवस्तीवर पोहोचले. लोकांची गर्दी झाल्याने बिबट्या धरणाच्या पाण्यात जाऊन पोहत असे व पुन्हा पाण्याच्या बाहेर येऊन बसत. बाहेर आलेल्या या बिबट्याला वनविभागाचे कर्मचारी रमेश खरमाळे यांनी गुंगी आणणारे इंजेक्शन (डार्ट) मारले, परंतु ते हुकले.

यानंतर डॉ. अजय देशमुख यांनी ब्लो पाइपणे (डार्ट) मारले, परंतु तो बिबट्याच्या हाडावर बसून उडाला. त्यामुळे बिबट्या गडबडून गेला. एकंदर हालचालीवरून बिबट्या आजारी व जखमी असल्याने आक्रमक नसल्याचे डॉ. अजय देशमुख यांच्या लक्षात आले. त्यामुळे वनविभागाचे कर्मचारी शिवाजी मोघे यांनी बिबट्याला जंगली प्राण्यांची दोरी गळ्यात अडकवून पकडण्याच्या साधनाने पकडण्याची सूचना केली. त्याप्रमाणे ( स्नेर) गळ्यात अडकवून बिबट्याला पकडण्यात आले. परंतु (स्नेर) तोडून बिबट्या वडज धरणाच्या पाण्याकडे धावला. बिबट्या धरणाच्या पाण्यात पोहत असतानाच थोडासा डार्ट लागल्याने बिबट्याला गुंगी येऊन पाण्यात बुडण्याचा धोका निर्माण झाला होता.

तोपर्यंत बिबट्या पाण्यात बुडू लागल्याने अनिल भालेराव, बबन भालेराव या युवकांनी पोहत जाऊन धाडसाने बिबट्याच्या शेपटीला पकडून त्याला धरणाच्या पाण्याबाहेर काढले. नंतर बिबट्याला जाळीत जेरबंद करून पुन्हा (डार्ट) मारून त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढून बिबट्याला वाचविले. या मादीला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. वनविभागाचे कर्मचारी कृष्णा दिघे, मडके, वैभव नेहरकर यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
 

Web Title: Lived in the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.